veen doghantali hi tutena rohan accident : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Veen Doghantali Hi Tutena सध्या प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवत आहे. प्रत्येक भागात नवं वळण, नवे कटकारस्थान आणि भावनिक संघर्ष पाहायला मिळत असून आता आगामी भागांमध्ये मालिकेचा थरार आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकताच शेअर करण्यात आलेला प्रोमो पाहता, संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरच एका मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे.
मालिकेत स्वानंदी अंशुमनचं सत्य सर्वांसमोर यावं, यासाठी सातत्यानं प्रयत्न करताना दिसते. मात्र मल्लिकाच्या डावपेचांमुळे समर आणि स्वानंदीमध्ये गैरसमज निर्माण होतात. दुसरीकडे, रोहनच्या आईशी झालेल्या मतभेदांमुळे अधिरा माहेरी जाते, ज्यामुळे रोहन आणि अधिरा दोघेही अस्वस्थ होतात. हे नातं पुन्हा एकत्र यावं, यासाठी स्वानंदी आणि समर प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. संक्रांतीच्या दिवशी रोहन आणि अधिराची भेट घडवून आणून त्यांचा संसार पुन्हा सुखाचा व्हावा, अशी स्वानंदीची इच्छा आहे.
मात्र याच क्षणी कथानकाला काळी छाया पडते. मल्लिका अंशुमनच्या मदतीने मोठा कट रचते. प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसतं की, मल्लिका अंशुमनला रोहन त्या ठिकाणी पोहोचणार नाही, याची जबाबदारी देताना दिसते. त्यानंतर जे घडतं, ते पाहून प्रेक्षक हादरतात. Veen Doghantali Hi Tutena च्या प्रोमोमध्ये रोहनचा भीषण अपघात दाखवण्यात आला आहे. वेगात असलेली गाडी अपघातग्रस्त होते, रोहन गाडीवरून खाली फेकला जातो आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागतो. तो जागच्या जागी बेशुद्ध पडलेला दिसतो.
या घटनेमुळे संक्रांतीच्या दिवशी स्वानंदीसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. रोहनचा जीव वाचवण्यासाठी ती काय पाऊल उचलणार, अंशुमनचा कट कधी आणि कसा उघडकीस येणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. झी मराठीनं हा प्रोमो शेअर करत “स्वानंदीला रोहनवर येणाऱ्या अनपेक्षित संकटाची चाहूल लागेल का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हे पण वाचा.. कमळी–लक्ष्मी निवास महासंगमात मोठा ट्विस्ट, कामिनी–अनिकाला मिळाली शिक्षा
दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रेक्षकांनी मालिकेत असलेल्या सततच्या नकारात्मक व्यक्तिरेखांवर नाराजी व्यक्त करत, “तीन व्हिलन काढा” अशी मागणी केली आहे. यावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. एकूणच Veen Doghantali Hi Tutena मालिकेतील आगामी भाग भावनिक आणि थरारक ठरणार असून, संक्रांतीचा दिवस आनंद घेऊन येणार की दु:ख, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
हे पण वाचा.. मकर संक्रांतीत रेश्मा शिंदेचा पारंपरिक लूक; ‘माझी पहिली मकर संक्रांत’ म्हणत शेअर केले खास फोटो









