ADVERTISEMENT

वीण दोघांतली ही तुटेना : मंदाकिनीनं मल्लिकाचा खरा चेहरा उघड केला, तरी समरचा काकीवरचाच विश्वास कायम

veen doghantali hi tutena mandakini against mallika : वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मंदाकिनी मल्लिकाविरोधात ठोस पुरावे सादर करताना दिसते. तरीही समरचा काकीवरचा विश्वास कायम राहणार की नाही, याची प्रेक्षकांना उत्सुकता.
veen doghantali hi tutena mandakini against mallika

veen doghantali hi tutena mandakini against mallika : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Veen Doghantali Hi Tutena सध्या जबरदस्त वळणावर पोहोचली आहे. प्रत्येक भागात नवनवे खुलासे आणि धक्कादायक घटना घडत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वानंदीने अंशुमनविरोधात हुशारीने पुरावे गोळा करत त्याची खरी ओळख समरसमोर आणली, तेव्हापासून मालिकेचा वेग अधिकच वाढला आहे. मात्र, या सगळ्या गोंधळामागे मल्लिकाचा कपटी डाव असल्याचं हळूहळू समोर येत आहे.

कथेच्या पुढील प्रवासात मल्लिका मंदाकिनीचा वापर करून रोहन आणि अधिराच्या संसारात विष कालवताना दिसते. अधिराला त्रास देण्यासाठी आणि नात्यात फूट पाडण्यासाठी मल्लिका मंदाकिनीला आर्थिक मदत करते. या सततच्या मानसिक छळामुळे अधिरा माहेरी जाण्याचा निर्णय घेते. याच दरम्यान, मंदाकिनी मल्लिकाच्या सांगण्यावरून रोहनला घटस्फोटाची नोटीस पाठवते. या घटनेचा इतका खोल परिणाम होतो की अधिरा टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते. हे सगळं पाहून स्वानंदी थेट रोहनला जाब विचारते, मात्र रोहन आपण अशी कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचं ठामपणे सांगतो.

या सगळ्या घडामोडींमुळे स्वानंदीच्या वडिलांना मंदाकिनीवर संशय येतो. अखेर मंदाकिनी स्वतःच आपला गुन्हा कबूल करते. यानंतर Veen Doghantali Hi Tutena चा नवा प्रोमो समोर आला असून, त्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. या प्रोमोमध्ये मंदाकिनी थेट राजवाडेंच्या घरात येऊन मल्लिकाविरोधात उघडपणे बोलताना दिसते. साळसूदपणाचा आव आणणाऱ्या मल्लिकाला ती जाब विचारते आणि रोहन-अधिराचं लग्न मोडण्यामागे मल्लिकाचाच कट असल्याचा आरोप करते.

विशेष म्हणजे, मंदाकिनी समरसमोर मल्लिकाविरोधातील ठोस पुरावेही सादर करते. मात्र, समरचा काकीवरील विश्वास अजूनही डळमळीत होणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. “माझी काकू आईच्या जागी आहे,” असं म्हणत समर मल्लिकाची बाजू घेतो. त्यामुळे सत्य समोर असूनही भावनिक नात्यांमुळे निर्णय कसा बदलतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

हे पण वाचा.. कोण होतीस तू… फेम साक्षी महाजन च्या घरी लगीनघाई! मेहंदीच्या फोटोनी वेधलं सगळ्यांचं लक्ष

Veen Doghantali Hi Tutena चा हा आगामी भाग प्रेक्षकांसाठी निर्णायक ठरणार आहे. मंदाकिनीच्या पुराव्यांमुळे मल्लिकाचं खरं रूप उघड होणार की पुन्हा कुठला नवा डाव रचला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. अभिनेत्री अनुष्का पिंपूटकर हिने सुरू केला स्वतःचा ज्वेलरी ब्रँड; बिझनेस लॉन्च करताच नवऱ्याची खास प्रतिक्रिया चर्चेत

veen doghantali hi tutena mandakini against mallika