vallari viraj zee marathi new serial update : मराठी टेलिव्हिजनवर सध्या नव्या मालिकांची चांगलीच धामधूम पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना वेगवेगळ्या कथानकांची, नवीन कलाकारांची आणि फ्रेश जोड्यांची नेहमीच उत्सुकता असते. अशातच झी मराठीने येत्या जानेवारीपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या नव्या मालिकेची पहिली झलक शेअर करताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. मालिकेचा छोटा टीझर प्रदर्शित झाला असला तरी त्यात नायक-नायिकेचे चेहरे दाखवलेले नाहीत, त्यामुळे नेटकऱ्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडीओसोबत “गोष्ट नवी, स्वप्न नवं, उत्साह नवा…” असं लिहिलं असून नव्या मालिकेबद्दल उत्सुकता वाढवण्यात आली आहे. या झलकनंतर अनेकांनी कमेंट्समध्ये या मालिकेत नायिका कोण असणार याचा अंदाज व्यक्त केला. काहीच वेळात Vallari Viraj हे नाव सर्वाधिक चर्चेत आलं. ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लारी विराज पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार, असा ठाम अंदाज प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे.
या चर्चेला अधिक जोर देणारा आणखी एक पुरावा म्हणजे वल्लारी विराज हिने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी. “पहिला कामाचा दिवस” असं लिहित तिने सेटवरील एक छोटा व्हिडीओ शेअर केला असून त्यामुळे चाहत्यांच्या तर्कांना आणखी बळ मिळालं आहे.
आता प्रेक्षकांच्या मनातला मोठा प्रश्न म्हणजे — Vallari Viraj सोबत हिरो कोण? याबाबत सध्या दोन प्रमुख नावे चर्चेत आहेत. काही चाहत्यांना पुन्हा राकेश बापटसोबत तिची जोडी पाहायची आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’मधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आजही आवडते. पण अनेकांनी प्रोमोतील नायकाचा अंदाज घेत, तो स्वानंद केतकर असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर तर ‘वल्लारी विराज आणि स्वानंद केतकरची फ्रेश जोडी’ असं सांगणारे पोस्ट्सही व्हायरल होत आहेत.
मात्र, चॅनेलकडून या दोन्ही कलाकारांच्या नावावर अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मालिकेचं नाव, कलाकार आणि पूर्ण प्रोमो कधी जाहीर होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
हे पण वाचा.. थँक्यू नाही, आता आय लव यू! तू ही रे माझा मितवा मालिकेत ईश्वरी अर्णवकडे व्यक्त करणार मनातील प्रेम
झी मराठीची ही नवी मालिका कोणत्या कथानकावर आधारित असेल, वल्लारी विराज कोणत्या भूमिकेत दिसेल आणि तिच्यासोबत कोणता अभिनेता झळकणार — हे सर्व तपशील लवकरच समोर येतील अशी अपेक्षा आहे. प्रेक्षक मात्र या नवीन जोडीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हे पण वाचा.. सूरजच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकरने तब्येत सुधारल्याचे सांगत व्हिडीओ शेअर केला









