मराठी मालिकांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सध्या तिच्या आयुष्याबद्दल आणि आगामी प्रकल्पांबद्दल चर्चेत आहे. अभिनेता किरण गायकवाड याच्याशी तिचं प्रेमविवाह झाल्यापासून दोघेही सातत्याने चर्चेत असतात. डिसेंबर २०२४ मध्ये दोघांनी सात फेरे घेतले. चाहत्यांनी या जोडप्याला दिलखुलास शुभेच्छांचा वर्षाव केला होता. पण लग्नानंतर त्यांचं वैवाहिक आयुष्य नेहमीसारखं सरळसोट राहिलेलं नाही.
अलीकडेच वैष्णवी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या संसाराविषयी बोलताना म्हणाली, “लग्नानंतर काही महिने आम्ही एकत्र होतो. पण लगेचच किरणच्या ‘देवमाणूस’ मालिकेचं काम सुरू झालं आणि आमचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप सुरू झालं. खरं सांगायचं तर लग्नाआधीही असंच होतं, आणि आता लग्नानंतरही तेच सुरू आहे.”
Vaishnavi Kalyankar ने खूप हलक्या फुलक्या अंदाजात तिच्या नात्याबद्दल सांगितलं. ती हसत म्हणाली, “त्याचा संसार तिकडे चालू आहे, माझा इकडे चालू आहे. पुणे आणि सातारा अशा दोन शहरांत आमची दुनिया विभागली आहे.” तिच्या या विधानावरून चाहत्यांना हसू आवरलं नाही.
Vaishnavi Kalyankar पुढे म्हणाली, “संसारात रमली आहेस का?” असं मला विचारलं गेलं. त्यावर मी सांगितलं की बऱ्यापैकी रमली आहे, कारण लग्न झाल्यानंतर ४-५ महिने आम्ही खरंच एकत्र होतो. त्यानंतर मात्र कामामुळे अंतर आलं.”
मुलाखतीत Vaishnavi Kalyankar ला विचारण्यात आलं की ‘घाबडकुंड’ चित्रपटातील भूमिकेबद्दल किरण गायकवाडची प्रतिक्रिया काय होती? त्यावर तिने सांगितलं, “माझ्याआधी त्यालाच या चित्रपटाबद्दल माहिती मिळाली होती. नंतर मला समजलं. जेव्हा माझ्या पर्यंत ही संधी आली, तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. कारण या चित्रपटातील भूमिका नेहमीपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक आहे.”
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांमध्ये वैष्णवी कल्याणकर आणि किरण गायकवाड यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. त्यांच्या लग्नाची बातमी चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज ठरली होती. विशेष म्हणजे, ‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या पर्वातही वैष्णवीने किरणसोबत स्क्रीन शेअर केली होती. तेव्हापासूनच दोघांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली होती.
वैष्णवी कल्याणकरने आपल्या अभिनय प्रवासात मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमांत काम केलं आहे. झी मराठीवरील ‘तू चाल पुढे’ मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘सण मराठी’ वरील ‘तिकळी’ मालिकेत तिने नायिकेची भूमिका निभावली. याशिवाय तिने ‘बांबू’ मालिकेतही काम केलं.
हे पण वाचा.. पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर लग्नबंधनात? बांदेकर कुटुंबीयांत चर्चांना उधाण
आता प्रेक्षक तिला ‘घाबडकुंड’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहणार आहेत. या चित्रपटातील तिची भूमिका वेगळी असून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यात तोल सांभाळणं नेहमीच कठीण जातं. वैष्णवी आणि किरण गायकवाड यांच्या बाबतीतही हेच घडलं आहे. लग्नानंतर फार काळ एकत्र राहता आलं नाही, पण तरीही दोघांनी आपापल्या करिअरसोबत वैवाहिक आयुष्य सांभाळत एकमेकांना प्रोत्साहन दिलं आहे.
वैष्णवीच्या म्हणण्यानुसार, दोघांचं बंधन कामामुळे अंतर वाढूनही तितकंच घट्ट आहे. तिच्या मोकळ्या आणि स्पष्ट बोलण्यामुळे चाहत्यांना तिच्या वैवाहिक आयुष्याची खरी झलक मिळाली.
हे पण वाचा.. Rutwik Talwalkar चा साखरपुडा; चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अनुष्कासोबत नव्या प्रवासाची सुरुवात
Vaishnavi Kalyankar आणि किरण गायकवाड हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेतले आणि प्रिय जोडपे आहे. लग्नानंतर लगेचच करिअरकडे वळल्यामुळे त्यांचं आयुष्य लाँग डिस्टन्समध्ये गेलं, तरी दोघेही या नात्याला सहजतेने आणि आनंदाने जगत आहेत. वैष्णवीचा ‘घाबडकुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.









