ADVERTISEMENT

उषा नाडकर्णी घरात नवऱ्याचा फोटो नसल्यावरून उठलेल्या चर्चेला उषा नाडकर्णींची ठाम प्रतिक्रिया

usha nadkarni husband photo controversy : उषा नाडकर्णी यांनी घरात पतीचा फोटो दिसत नसल्याबद्दल विचारणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. सोशल मीडियावर अनावश्यक कमेंट करणाऱ्यांवर त्यांनी संताप व्यक्त करत, “जे दिसतंय ते बघा, नाही आवडत तर पुढे जा,” असे ठामपणे सांगितले.
usha nadkarni husband photo controversy

usha nadkarni husband photo controversy : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणाऱ्या अनुभवी अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) या त्यांच्याच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. अनेक वर्षांपासून त्यांनी विविध ठिकाणी मोकळेपणाने मते मांडली आहेत. अलीकडेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत घरातील पतीचा फोटो दिसत नसल्याबद्दल चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उषा यांनी प्रथमच थेट आणि ठाम भूमिका मांडली.

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या घराची झलक दाखवली. व्हिडीओ प्रकाशित झाल्यानंतर काही प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये घरात पतीचा फोटो का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. या सततच्या प्रश्नांमुळे उषा नाडकर्णींना नाराजी व्यक्त करावी लागली.

त्या म्हणाल्या, “आजकाल काही लोकांना वाटतं की मीडिया म्हणजे त्यांच्याच घरची मालमत्ता. जे काही दिसतं ते पाहून लगेच बोलायला सुरुवात करतात. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतकं का विचारायचं? कोणाच्या घरी कोणाचा फोटो आहे किंवा नाही, याबद्दल इतकं कुतूहल कशाला?”

यावर पुढे बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या की त्या कमेंट्स वाचतात, पण अनेकदा विसंगत आणि अनावश्यक बोलणाऱ्यांमुळे वाईटही वाटतं. “मी नावं बघत नाही, पण काही लोक काहीही लिहितात. जे मी दाखवत आहे ते बघा; आणि नसेल आवडत तर पुढे जा. पण हा नवरा नाही, भाऊ नाही, आई नाही—अशा गोष्टी विचारणं म्हणजे गरजेचं नाही. प्रत्येकालाच भावना असतात. खूप वेळा रागही येतो,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

उषा नाडकर्णी यांनी नेहमीप्रमाणे अगदी साधेपणाने पण ठाम शब्दांत उत्तर देत, वैयक्तिक गोष्टींवर अनावश्यक टिप्पणी करण्याची सवय असलेल्या नेटिझन्सना चांगलाच सुनावलं. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेकांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

हे पण वाचा.. मालेगाव प्रकरणावर शशांक केतकरची बायको प्रियंकाचा संताप; मनाली या विकृत लोकांना..

मराठी मनोरंजन विश्वात नेहमी निर्भीडपणे मत मांडणाऱ्या Usha Nadkarni यांच्या या मुलाखतीने प्रेक्षकांचेही लक्ष वेधले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेला साधेपणा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेतून दिसून येतो. अशा सरळसोट भाषेत बोलणाऱ्या कलाकारांना प्रेक्षक नेहमीच विशेष मान देतात.

हे पण वाचा.. सूरज चव्हाण च्या नव्या घरातील खास बाल्कनीची चर्चा; पहिल्या मजल्यावरून दिसतो भावूक करणारा दृश्य