मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रिया बापट आणि Umesh Kamat. नाटक, चित्रपट, वेब सिरीज आणि टेलिव्हिजन या सर्वच माध्यमांतून या दोघांनी स्वतंत्रपणे मोठी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालते. मात्र, या जोडीला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांना तब्बल १२ वर्षांचा दीर्घकाळ वाट पाहावी लागली. ‘टाईम प्लीज’ (२०१२) या चित्रपटानंतर हे दोघे पुन्हा एकत्र झळकले नव्हते.
आता अखेर या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळत आहे. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या नव्या चित्रपटात प्रिया आणि उमेश जोडी एकत्र दिसणार आहे. गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने यांसारखे दिग्गज कलाकारदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला आणि याच प्रसंगी Umesh Kamat यांनी १२ वर्षांपासून त्यांनी प्रिया बापटसोबत चित्रपटात काम का केले नाही याबाबतचे गुपित उघड केले.
ट्रेलर लाँच सोहळ्यात दिग्दर्शक पुष्कर श्रोत्रीने थेट प्रश्न विचारला – “१२ वर्षांनी पुन्हा एकत्र का दिसताय?” त्यावर प्रिया बापटने हसत उत्तर दिलं, “योग्य अशी स्क्रिप्ट तयार करायला आदित्यने १२ वर्षं घेतली.”
यानंतर Umesh Kamat यांनी मन मोकळं करत सांगितलं –
“खरं तर आम्ही १२ वर्षांपूर्वी एकत्र खूप काम केलं. टेलिव्हिजनवरील ‘नवा गडी नवं राज्य’ आणि त्यानंतर ‘टाईम प्लीज’ या चित्रपटात आम्ही एकत्र होतो. तेव्हा आम्हीच ठरवलं की, आता थोडं वेगळं काम करायला हवं. लोकांच्या मनात असा शिक्का बसू नये की, प्रियाला घेतलं म्हणजे उमेशला घ्यावंच लागतं, किंवा उमेशला घेतलं की प्रिया आलीच पाहिजे. म्हणून आम्ही जाणूनबुजून काही काळ एकत्र प्रोजेक्ट्स टाळले.”
त्यांनी पुढे सांगितले, “नंतर चार वर्षांनी वाटलं की, पुन्हा एकत्र काम करूया. पण योग्य अशी भूमिका मिळत नव्हती. मनाप्रमाणे स्क्रिप्ट मिळाली नाही. म्हणून थांबावं लागलं. अखेर ‘बिन लग्नाची गोष्ट’ मिळाली आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो.”
प्रिया बापट गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘अंधेरा’ वेब सिरीजमुळे चर्चेत होती. तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक झाले. त्याचबरोबर रंगभूमीवर उमेश आणि प्रिया सध्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत असून, स्टेजवरील या जोडीला प्रेक्षकांचा नेहमीच टाळ्यांचा कडकडाट मिळतो.
मात्र, मोठ्या पडद्यावर या जोडीचा ‘कमीबॅक’ पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या उपस्थितीमुळे या चित्रपटाची ताकद आणखी वाढली आहे.
या चित्रपटात प्रिया-उमेशच्या केमिस्ट्रीसोबतच कौटुंबिक नातेसंबंध, नात्यांमधील गुंतागुंत आणि भावनिक क्षणांचं दर्शन घडणार आहे. हलकंफुलकं मनोरंजन, हशा आणि हृदयाला भिडणारे प्रसंग अशा सर्व गोष्टींची मेजवानी हा सिनेमा देईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रिय-उमेशची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
हे पण वाचा.. Hardeek Joshi च्या ‘अरण्य’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांना पुन्हा दिसणार राणा दा एका वेगळ्या रूपात
दोघंही कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असून, त्यांच्या पोस्ट्सला प्रचंड प्रतिसाद मिळतो. चाहत्यांसोबत संवाद साधण्यापासून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण शेअर करण्यापर्यंत हे दोघंही कायम चर्चेत असतात. त्यामुळेच ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे.
१२ वर्षांनंतर एकत्र पडद्यावर दिसणारी ही जोडी प्रेक्षकांसाठी खास भेट ठरणार आहे. Umesh Kamat यांनी सांगितलेल्या ‘असा शिक्का बसेल म्हणून एकत्र कामं’ या वक्तव्यामुळे चाहत्यांच्या मनातील कुतूहल अधिकच वाढलं आहे. आता त्यांच्या या नव्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. Usha Nadkarni यांनी बालपणीचा धक्कादायक अनुभव सांगितला; म्हणाल्या, ‘वडिलांची भीती आजही मनातून गेली नाही’”









