Umesh Kamat याने नातेसंबंधांवर मोलाचं मत व्यक्त केलं आहे. नात्यात आपल्याला हवं ते मिळणं महत्त्वाचं नाही, तर समोरच्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधला तरच ते नातं अधिक बळकट होतं, असं उमेश कामत म्हणतो.
उमेश कामतचा सल्ला : नात्यांत “माझं” नको, “आपलं” हवं !
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता Umesh Kamat आपल्या प्रेक्षकांसमोर सतत वेगवेगळ्या भूमिकांमधून येत असतो. सध्या तो ‘येरे येरे पैसा ३‘ या चित्रपटात आपल्या विनोदी आणि प्रभावी अभिनयामुळे चर्चेत आहे. मात्र अभिनयाच्या पलीकडे जाऊन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उमेश कामतने नातेसंबंधांविषयी अतिशय परखड आणि प्रगल्भ मत मांडले आहे.
‘अजब गजब‘ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत उमेशला विचारण्यात आलं की नातं टिकवण्यासाठी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची असते? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “नात्यात सगळ्यात आधी आदर हवा. एकमेकांच्या भावना, स्वप्नं यांचा आदर केलात, त्यात आनंद मानलात तर नातं आपोआप घट्ट होतं. मला नात्यात काय हवंय हे विचारण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय हवंय याचा विचार केला पाहिजे.”
उमेशच्या मते, नात्यात स्पेस अत्यावश्यक आहे. “तुमच्या पार्टनरला तिचं स्वतंत्र अस्तित्व, आत्मविश्वास यासाठी साथ द्यायला हवी. तिला स्वप्न पूर्ण करायची असतील, तर तिच्या मागे उभं राहणं हे जोडीदार म्हणून कर्तव्य आहे. नातं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांच्या स्वप्नांसोबत चालणंही आहे,” असं तो म्हणाला.
Umesh Kamat ने स्वतःच्या वैयक्तिक अनुभवाचा दाखला देताना सांगितलं, “छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या, लाड केल्या, संवाद साधला तर नातं खूप सोपं होतं. जे मनात आहे ते स्पष्ट बोलणं महत्त्वाचं आहे.” मात्र या सगळ्या गोष्टी सांगताना उमेशने मिश्किलपणे हेही कबूल केलं की, “या पैकी अर्ध्या गोष्टी मी स्वतः करत नाही, पण अनुभवातून शिकत आहे.”
हे पण वाचा ..Ye Re Ye Re Paisa 3′ पाहून प्रवीण तरडेंचा उत्स्फूर्त प्रतिसाद, म्हणाले – मराठीतही व्यावसायिक सिनेमा शक्य!
प्रिया बापटसोबत उमेशचे नाते मराठी मनोरंजनविश्वात एक आदर्श म्हणून पाहिलं जातं. ते कायमच एकमेकांच्या कामाला आणि निर्णयांना पाठिंबा देताना दिसतात. दोघं सध्या ‘जर तरची गोष्ट‘ या नाटकात एकत्र काम करत असून त्यांच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत.
दरम्यान, ‘येरे येरे पैसा ३‘ या चित्रपटानेही चांगला गल्ला जमवत असल्याचं चित्र आहे. या सिनेमात
Umesh Kamat सोबत तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार यांसारख्या कलाकारांनीही प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
Umesh Kamat च्या या मताने पुन्हा एकदा हे अधोरेखित झालं आहे की, फक्त करिअर नाही, तर वैयक्तिक नातेसंबंधातही संवेदनशीलता आणि समजूतदारपणा याला तितकंच महत्त्व आहे.
हे पण वाचा..Janhavi Killekar : “मी हिरॉइनपेक्षा सुंदर वाटले म्हणून मला मालिकेतून काढून टाकलं होत”