अभिनेता tushar ghadigaonkar च्या आत्महत्येने मराठी कलाविश्व हादरलं असून, कामाच्या अभावातून आलेल्या नैराश्याने ही टोकाची कृती घडल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी टेलिव्हिजन आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता tushar ghadigaonkar याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बातमी समजताच संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टी हादरून गेली आहे. गेल्या काही काळापासून काम मिळत नसल्याने आलेल्या नैराश्याच्या भरात तुषारने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.
tushar ghadigaonkar हा एक संवेदनशील, मेहनती आणि भूमिकांमध्ये सहज समरस होणारा कलाकार म्हणून ओळखला जात होता. त्याने ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमधून छोट्या पण ठसठशीत भूमिका साकारल्या होत्या. प्रेक्षकांनी त्याच्या सहज अभिनयशैलीला भरभरून दाद दिली होती.
तुषारचं मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असून त्याने मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण घेतलं. कॉलेजच्या काळातच रंगभूमीशी त्याची जवळीक झाली. रुपारेलच्या नाट्यविभागात तो एक परिचित आणि लोकप्रिय चेहरा होता. त्याच्या मित्रमंडळींमध्ये ‘घाड्या’ या टोपणनावाने त्याची ओळख होती.
हे पण वाचा ..जस्सी परतलाय! ‘Son Of Sardaar 2’ चं धमाकेदार पोस्टर प्रदर्शित; अजय देवगणचा सरदार पुन्हा येणार मोठ्या पडद्यावर
tushar ghadigaonkar याने मालिकांसोबतच काही मराठी चित्रपटांतही काम केले होते. ‘भाऊबळी’, ‘झोंबिवली’, ‘उनाड’ या चित्रपटांमधून त्याने आपली कला सिद्ध केली. तसेच ‘संगीत बिबट आख्यान’ या रंगभूमीवरील प्रयोगातही त्याची भूमिका लक्षवेधी ठरली. अलीकडेच तो ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेत झळकला होता.
त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक सहकलाकारांनी भावना व्यक्त केल्या. अभिनेता अंकुर वाढवे याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “मित्रा का? कश्यासाठी? कामं येतात जातात! पण आत्महत्या हा मार्ग नाही! सध्याची परिस्थिती नक्कीच कठीण आहे, पण हा निर्णय नाही होऊ शकत. तुषार घाडीगावकर, तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो.”
अभिनेता वैभव मांगले यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत एक कटू सत्य मांडलं. “माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात… अपेक्षा आणि वास्तव यांचं गणित कधीच जुळत नाही… अशी माणसं नंतर नंतर एकटी पडत असावीत का?” या शब्दांत त्यांनी समजून घेणाऱ्या समाजाच्या अभावाकडे बोट दाखवलं.
tushar ghadigaonkar याच्या निधनाने पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रातल्या अस्थिरतेचा आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. इंडस्ट्रीमधील स्पर्धा, कामाच्या संधींची अनिश्चितता आणि सततचा तणाव या सगळ्यांचा कलाकारांवर खोल परिणाम होत असतो. तुषारसारखा संवेदनशील कलाकार त्याचं मूळ हरवतो, तेव्हा हे संपूर्ण समाजासाठी धोक्याचं संकेत ठरतो.
tushar ghadigaonkar हे नाव आता केवळ आठवणींमध्ये उरेल, पण त्याच्या आयुष्याची ही शोकांतिका मनोरंजन विश्वातील प्रत्येकासाठी एक धोक्याची घंटा आहे. या घटनेनंतर त्याच्या कार्याचा गौरव करणे जितके महत्त्वाचे, तितकेच महत्त्वाचे आहे कलाकारांच्या मानसिक आरोग्याकडे संवेदनशीलतेने आणि वेळेवर लक्ष देणे. tushar ghadigaonkar च्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. पण त्याच्या आठवणी आणि कलाकृती मात्र कायम लोकांच्या मनात राहतील.