tula japnar ahe mahima mhatre shantatechi vatt : नवरात्र हा सण रंग, भक्ती, उत्साह आणि देवीच्या विविध रूपांमधून प्रकट होणाऱ्या शक्तीचा उत्सव म्हणून ओळखला जातो. या सणात लोक देवीच्या विविध रुपांचे महत्व जाणून घेतात आणि त्यांचा आनंद आणि श्रद्धा अनुभवतात. कलाकारांनाही देवीची मनोभावे पूजा करणे, आराधना करणे यामध्ये खूप रुची असते.
‘तुला जपणार आहे’ या लोकप्रिय मालिकेत मीरा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे देवी महागौरीच्या प्रेरणेबद्दल आणि तिच्या स्वभावाबद्दल खुलासा करते. महिमा म्हणते, “माझा स्वभाव शांत आणि संयमी आहे, तसेच मी थोडी अंतर्मुख आहे. मला वाटते की मी महागौरीशी जोडली गेली आहे, कारण तिला शांती, स्थिरता आणि पवित्रतेची झलक आहे.”
महिमा पुढे सांगते की तिचा शांत स्वभाव शूटिंगदरम्यान खूप उपयोगी ठरतो. “एखादा सीन करताना मन शांत आणि एकाग्र असल्यास त्याचा परिणाम उत्तम येतो. जिथे मतभेद असतात, तिथे वाद होण्याआधी मी त्या परिस्थितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते,” असे महिमा म्हणते. तिच्या मते, कलाकार म्हणून यश मिळवण्यासाठी संयम फार महत्त्वाचा आहे, कारण ऑडिशन, सिलेक्शन आणि शूटिंग अशा अनेक टप्प्यांतून जायचं असतं.
महिमा तिच्या व्यस्त दिनचर्येबद्दलही बोलली. “माझी दिनचर्या खूप व्यग्र आहे. त्यात प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांभाळण्यासाठी संयम आणि स्थिरता असणे आवश्यक आहे. मला माझ्या आयुष्यात काय हवे हे ठाऊक आहे आणि त्या दृष्टीने मी फार स्पष्ट विचारांची आहे,” असं तिने सांगितलं.
हे पण वाचा.. ‘Bigg Boss 19’ house मध्ये सापाची एंट्री, मृदुल तिवारीनं दाखवलं धाडस; प्रेक्षक थक्क!
‘तुला जपणार आहे’ मधील मीरा ही पात्र हळवी असली तरी खंबीर आहे, आणि महिमा या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवत आहे. महिमा म्हात्रेच्या अभिनयातील शांतता आणि संयम प्रेक्षकांना त्याच्या भूमिकेशी सहज जोडते.
अशा प्रकारे, महिमा म्हात्रे तिच्या नैसर्गिक गुणांचा आणि महागौरीच्या प्रेरणेचा उपयोग करत, मीरा पात्राला जीवन देत आहे. तिचा अभिनय आणि व्यक्तिमत्व दोन्हीच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून देत आहेत.
हे पण वाचा.. “नवरात्रीत देवीदर्शनाचा खास अनुभव, तेजस्विनी लोणारीने सांगितली मनाला भिडणारी गोष्ट””









