ADVERTISEMENT

तू ही रे माझा मितवा मध्ये ईश्वरीचा कडक इशारा; लावण्याचा प्लॅन फसला, नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता

tu hi re maza mitwa new promo twist : तू ही रे माझा मितवा मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. अर्णवला जाळ्यात अडकवण्याचा लावण्याचा प्लॅन फसवत ईश्वरीनं तिला चांगलाच धडा शिकवल्याचं दृश्य चर्चेत आलं आहे.
tu hi re maza mitwa new promo twist

tu hi re maza mitwa new promo twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा (Tu Hi Re Maza Mitwa) सध्या मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. मालिकेचा नुकताच समोर आलेला प्रोमो प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतोय. अर्णव–ईश्वरीच्या नात्यात प्रेमाची नवी चाहूल लागलेली असतानाच लावण्याचा डाव पुन्हा एकदा उघड झाल्याचं दाखवण्यात आलं असून या सीनने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

अर्णव आणि ईश्वरीचं अनपेक्षित लग्न जरी सुरुवातीला ताणतणावात झालं असलं, तरी वेळेनुसार दोघांमध्ये विश्वास आणि मैत्री वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, राकेशकडून वाचवण्यासाठी अर्णवने ईश्वरीशी लग्न केल्याचं सत्य समजल्यापासून ईश्वरीच्या मनात अर्णवबद्दलचं मत बदललं आणि त्यांचं नातं हळूहळू प्रेमाच्या दिशेनं पुढे सरकत आहे. त्यामुळे तू ही रे माझा मितवा चे नवीन भाग रसिकांच्या उत्सुकतेत भर टाकत आहेत.

दुसरीकडे लावण्याच्या मनात अर्णवबद्दलचं आकर्षण अजूनही जिवंत आहे. अर्णवचं ईश्वरीशी लग्न झाल्यानं तिचं बायको म्हणून राजेशिर्के कुटुंबात स्थान मिळवण्याचं स्वप्न आधीच भंगलं आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा अर्णवला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न ती करत असते. ताज्या प्रोमोमध्ये तिने अर्णवच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळल्याचं दाखवलं आहे. अर्णवला भान राहत नाही हे पाहताच लावण्या त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करते.

मात्र, तिचा हा कपटी प्लॅन यशस्वी होण्याआधीच ईश्वरी तिथे पोहोचते. अर्णवला सुरक्षित बाहेर काढून ती लावण्याला एक थाप लगावते आणि ठाम शब्दांत बजावते की, “माझा नवरा फक्त माझाच आहे. बायकोसमोर बाहेरच्या स्त्रीने असे प्रकार केले तर कानाखाली असाच आवाज निघतो.” या संवादामुळे प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं कमेंट्सवरून दिसून येत आहे.

अर्णवचा आवाज हरवल्याचा ट्रॅक नुकताच प्रसारित झाला होता. त्या परिस्थितीतही ईश्वरीनं त्याच्या जागी प्रेझेंटेशन करून कुटुंबासाठी महत्त्वाची डील जिंकून दाखवली होती. त्यामुळे तिचं कौतुक तर झालंच, पण लावण्याच्या मनातील राग आणखी वाढला.

हे पण वाचा.. स्टार प्रवाहवर बदलांची घोषणा! ‘काजळमाया’ आणि ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकांच्या वेळेत मोठा बदल

आता तिचा संयम सुटत चालला आहे. ईश्वरीनं तिचा प्लॅन उधळून लावल्यामुळे ती कोणता नवीन बदला घेणार, हा प्रश्न प्रेक्षकांना भेडसावत आहे. येणाऱ्या भागांमध्ये Tu Hi Re Maza Mitwa मालिकेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत, हे निश्चित.

हे पण वाचा.. स्नेहलता वसईकरची ‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ मालिकेतून एक्झिट; आता शीतल क्षीरसागर दिसणार माईसाहेबांच्या नव्या रूपात

tu hi re maza mitwa new promo twist