tu hi re maza mitwa new promo love confession : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा (Tu Hi Re Maza Mitwa) प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. अल्पावधीतच या मालिकेनं टीआरपीमध्ये मजबूत स्थान मिळवलं असून, अर्णव-ईश्वरीची मनमोहक जोडी हा या मालिकेचा सर्वात मोठा आकर्षणबिंदू ठरत आहे. मनाविरुद्ध झालेल्या लग्नापासून सुरू झालेलं त्यांचं नातं आता प्रेमाच्या उंबरठ्यावर पोहोचताना दिसत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला नवा प्रोमो याच प्रवासाला अधिक रंगत आणणारा आहे.
मालिकेतील कथेनुसार काही दिवसांपूर्वी अर्णव आणि ईश्वरीचं लग्न पार पडतं. सुरुवातीला रागाने भरलेली ईश्वरी हळूहळू अर्णवच्या मनातील खरं कारण समजते—तिला राकेशपासून वाचवण्यासाठी त्याने घेतलेला मोठा निर्णय. या सत्यामुळे त्यांच्या नात्यात समझोता निर्माण होऊन मैत्रीची नवी पायरी तयार होते. हीच मैत्री आता प्रेमात परिवर्तित होत असून, या भावनांना शब्द द्यायला ईश्वरी अजूनही धजावत नाही, हे नव्या प्रोमोमध्ये अधोरेखित होतं.
प्रोमोमध्ये अर्णव ईश्वरीला सरप्राईज म्हणून बाहेर जेवायला घेऊन जातो. चायनीज सूप पिताना त्याला अचानक ठसका लागतो आणि बाजूला बसलेली महिला ईश्वरीवर टोमणा मारते. पण तत्परतेने ईश्वरी तिच्या नवऱ्याची काळजी घेत असल्याचं स्पष्ट करते. या क्षणी अर्णव तिच्याकडे पाहत म्हणतो, “मनात काही असेल तर थेट मला सांग.” हे वाक्य ऐकून ईश्वरीचा गोंधळलेला चेहरा पाहण्यासारखा आहे.
अर्णवला तिचे मनोगत कळावेत, अशी ईश्वरीची इच्छा असली तरी तोंडाने बोलण्याची हिम्मत ती जमवू शकत नाही. दुसरीकडे छोटीशी चूक झाल्यामुळे दोघांमध्ये झालेला रुसवा-फुगवा प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. भेटवस्तूंनी सॉरी म्हणण्याऐवजी तोंडाने माफी मागावी, अशी ईश्वरीची साधी अपेक्षा असून अर्णवही तिच्यासाठी खास सरप्राईजची योजना करतो आहे.
हे पण वाचा.. ठरलं तर मग’ मालिकेत नवा कलाटणीचा क्षण! प्रतिमाच्या भूतकाळाचा शोध घेण्यासाठी सायलीची धडपड; महिपतीमुळे उलगडले धागेदोरे
आगामी भागांमध्ये अर्णव-ईश्वरीच्या या हळुवार प्रेमकथेचा नवा अध्याय उलगडणार आहे. तू ही रे माझा मितवा मधील हा विशेष प्रेमसंपन्न भाग २५ नोव्हेंबरला प्रसारित होणार असून, प्रेक्षकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे पण वाचा.. कमळी मालिकेत धडाकेबाज ट्विस्ट! अनिका करणार हृषीला प्रपोज, कमळी–हृषीच्या नात्यात नवं वळण?









