ADVERTISEMENT

अर्णव-ईश्वरीच्या नात्यातील गैरसमज दूर होणार? तू ही रे माझा मितवा च्या नव्या रोमँटिक प्रोमोने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

tu hi re maza mitwa arnav ishwari misunderstanding promo : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा मध्ये अर्णव-ईश्वरीच्या नात्याला गोड वळण मिळताना दिसणार आहे. नव्या प्रोमोमधील ‘मिस इंदौर’ सीनमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
tu hi re maza mitwa arnav ishwari misunderstanding promo

tu hi re maza mitwa arnav ishwari misunderstanding promo : स्टार प्रवाहवरील Tu Hi Re Maza Mitwa ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते आहे. अर्णव आणि ईश्वरी यांची केमिस्ट्री, भावनिक प्रसंग आणि कथानकातील अनपेक्षित वळणं यामुळे ही मालिका सातत्याने चर्चेत आहे. प्रत्येक भागात काहीतरी नवीन घडत असल्याने प्रेक्षक मालिका पाहण्यास उत्सुक असतात. अशातच आता मालिकेचा एक नवा आणि हटके प्रोमो समोर आला असून, अर्णव-ईश्वरीच्या नात्यातील गैरसमज लवकरच दूर होणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

मालिकेतील अलीकडील भागात अर्णवची गरोदर बहीण अंजली आणि ईश्वरी यांचा भीषण अपघात झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रसंगात ईश्वरीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंजलीला वाचवलं. या घटनेनंतर अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल प्रेमाची भावना अधिक घट्ट झाली असली, तरी एका गैरसमजामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला दिसतो. अर्णव मनातल्या भावना उघडपणे व्यक्त करू शकत नाही, तर ईश्वरी मात्र त्याच्याशी नातं सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये एक गंमतीशीर पण भावनिक प्रसंग दाखवण्यात आला आहे. अपघातानंतर ईश्वरीच्या हाताला दुखापत झाली असून, अर्णव माणुसकीच्या नात्याने तिची काळजी घेताना दिसतो. याच दरम्यान रस्त्यावर एक व्यक्ती आपल्या पत्नीला ‘मिस इंदौर’ अशी हाक मारतो. मात्र अर्णवला तो शब्द ईश्वरीसाठी वापरला गेला असा गैरसमज होतो. रागाच्या भरात अर्णव त्या व्यक्तीची कॉलर पकडत, “माझ्या बायकोला फक्त मीच मिस इंदौर म्हणू शकतो,” असं ठणकावून सांगतो.

थोड्याच वेळात त्या व्यक्तीची पत्नी तिथे येते आणि अर्णवचा गैरसमज दूर होतो. आपली चूक लक्षात आल्यानंतर अर्णव माफी मागतो. मात्र या सगळ्या प्रसंगातून अर्णवचं ईश्वरीवरचं प्रेम नकळतपणे व्यक्त होतं. हे पाहून ईश्वरीही भावूक होते आणि हसत म्हणते, “बायको म्हणून या मिस इंदौरचा कॉपीराइट फक्त तुमचाच आहे.” हा संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर चाहत्यांनी ‘किती गोड’, ‘कमाल सीन’, ‘अर्णव-ईश्वरीचा गैरसमज लवकर संपो’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे पण वाचा.. सावली आणि भैरवी आमनेसामने! सावळ्याची जणू सावली मालिकेत रंगणार गुरू-शिष्यांची सुरांची जुगलबंदी

Tu Hi Re Maza Mitwa ही मालिका सध्या टीआरपीमध्ये टॉप २ मध्ये आहे. सुरुवातीला उशिरा प्रसारित होणारी ही मालिका प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आता प्राइम टाइम स्लॉटमध्ये दाखवली जाते. अर्णव-ईश्वरीची जोडी आणि त्यांच्यातील भावनिक नातं हेच या यशाचं प्रमुख कारण मानलं जात आहे. येत्या २ फेब्रुवारीला प्रसारित होणारा हा खास भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा ठरणार आहे.

हे पण वाचा.. खेळ पलटणार! लक्ष्मी निवासच्या नव्या प्रोमोमध्ये जान्हवीचा निर्धार, जयंतला थेट आव्हान

tu hi re maza mitwa arnav ishwari misunderstanding promo