tu hi re maza mitwa arnav ishwari lagn twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘Tu Hi Re Maza Mitwa’ सध्या नवनवीन घडामोडींमुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. मालिकेत अर्णव आणि ईश्वरी यांच्या नात्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. दोघांची जुळलेली केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली असली तरी, लावण्याशी अर्णवचं लग्न ठरल्यामुळे कथानकात तणाव निर्माण झाला होता.
अलीकडच्या भागात अर्णव-लावण्या यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. हळदी समारंभाचे दृश्यही रंगले होते. मात्र या प्रसंगी अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दलची काळजी अधिकच वाढली आणि तो मध्येच उठून तिच्या मदतीसाठी निघून गेला. इथेच कथानकाने मोठा कलाटणी घेतली.
ईश्वरीच्या आयुष्यात संकटं संपायचं नाव घेत नाहीत. तिचा विश्वास जिंकून तिला फसवण्यासाठी राकेशने अनेक डाव आखले होते. त्यानेच आधी तिच्या वडिलांचा अपघात घडवून आणला होता आणि दोष अर्णववर टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळीही त्याने ईश्वरीला कुलदैवताच्या दर्शनाच्या बहाण्याने एका अज्ञात ठिकाणी नेलं होतं. त्याच्या या योजनेतून तिला वाचवण्यासाठी अर्णव धावून पोहोचतो आणि घडते मालिकेतील सर्वात मोठं वळण.
नव्या प्रोमोमध्ये दाखवलेला प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. पोलिसांच्या कारवाईदरम्यान ईश्वरीची अब्रू धोक्यात येऊ नये, म्हणून अर्णव तिला आपली पत्नी असल्याचं जाहीर करतो आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. एका बाजूला लावण्याशी ठरलेलं लग्न आणि दुसऱ्या बाजूला ईश्वरीशी जुळलेलं नातं – अशा द्विधा स्थितीत अर्णवचा हा निर्णय मालिकेत नवा रंग भरणारा ठरतो.
हे पण वाचा.. ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी गोखले हिची नवी कार; चाहत्यांना दाखवली Hyundai Creta ची झलक
या प्रसंगानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. अर्णव-ईश्वरी खरंच एकत्र येणार का? लावण्या या नव्या नात्याकडे कशी पाहील? राकेशचे कारस्थान आणखी कुठपर्यंत पोहोचेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आगामी भागांत मिळणार आहेत.
सध्या सोशल मीडियावर ‘Tu Hi Re Maza Mitwa’ या मालिकेच्या या ट्विस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. चाहत्यांनी अर्णव-ईश्वरीच्या जोडीला दिलेला पाठिंबा स्पष्ट दिसतोय. या नव्या वळणामुळे पुढील भाग आणखी रोचक होणार यात शंका नाही.
हे पण वाचा.. “‘स्वराज्य’ हे फक्त घराचं नाव नाही, ती एक जबाबदारी आहे; अश्विनी महांगडेंची भावूक पोस्ट चर्चेत””









