मराठी टेलिव्हिजनवर सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे ‘Tu Hi Re Majha Mitva’. या मालिकेतील दमदार अभिनय, रंगतदार कथानक आणि कलाकारांमधील उत्तम केमिस्ट्रीमुळे ती अल्पावधीतच चर्चेत आली आहे. मात्र, मालिकेच्या कथानकाइतकाच कलाकारांचा सेटवरील ऑफ-स्क्रीन मस्तीचा अंदाजही चाहत्यांना तितकाच आवडतो. अलीकडेच या मालिकेतील तीन अभिनेत्रींचा एक धमाल डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
या व्हिडीओमध्ये अंजली राजेशिर्केची भूमिका साकारणारी रुपल नंद, वल्लरी पाटीलच्या भूमिकेत असलेली सुरभी भावे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुभद्रा पाटील साकारणारी स्वाती चिटणीस यांनी एकत्र येऊन गाजलेल्या ‘आम्ही कांचो’ या गाण्यावर अतरंगी स्टेप्स केल्या आहेत. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील हे गाणं आजही रसिकांच्या मनात ताजं आहे. जॉनी लिव्हर यांच्या खास रॅप शैलीमुळे हे गाणं वेगळं ठरलं होतं, आणि आता या तिघींच्या डान्समुळे ते पुन्हा चर्चेत आलं आहे.
सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओमध्ये तिन्ही अभिनेत्रींचा कॅज्युअल अंदाज, चेहऱ्यावरील हसू आणि मस्तीचा मूड स्पष्ट जाणवतो. त्यांनी केवळ डान्सच नाही, तर आपल्या केमिस्ट्रीमुळे चाहत्यांनाही या व्हिडीओचा आनंद लुटायला लावला.
चाहत्यांसह सहकलाकारांनीही या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालिकेत राकेश भोसलेची भूमिका साकारणाऱ्या आशुतोष गोखलेने “प्रसिद्ध आहेत रिल” अशी मिश्कील कमेंट करत रुपल नंदला टॅग केलं. तर सर्वांचा लाडका ‘राया’ म्हणजेच विशाल निकमने हसऱ्या इमोजी टाकत आपली प्रतिक्रिया दिली.
हे पण वाचा.. Vin Doghantali Hi Tutena’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस; तेजश्री-सुबोधच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा
स्टार प्रवाहच्या Tu Hi Re Majha Mitva या लोकप्रिय मालिकेच्या कथानकात सध्या मोठा ट्विस्ट येणार आहे. अर्णवला त्याच्या जीजाबद्दलचं सत्य समजलं असून, तो हे सत्य बहिणीला सांगणार आहे. त्यामुळे पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना नवे वळण आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. मात्र, या तणावपूर्ण कथानकाच्या पार्श्वभूमीवर असा मोकळा आणि आनंदी व्हिडीओ चाहत्यांसाठी एक वेगळाच ट्रीट ठरला आहे.
या व्हिडीओच्या व्हायरल होण्यामागे फक्त गाण्याची लोकप्रियता नाही, तर ‘तूTu Hi Re Majha Mitva’च्या कलाकारांची खरी मैत्री आणि सेटवरील आपुलकीचा भावही आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी आपल्या चाहत्यांशी जोडलेलं हे नातंच त्यांच्या लोकप्रियतेला अधिक बळ देत आहे.
प्रेक्षकांनी या डान्स व्हिडीओवर केवळ कमेंट्सच नाही, तर शेअर्स आणि लाइक्सद्वारेही भरभरून प्रतिसाद दिला आहे. काहींनी या तिघींच्या एनर्जीचं कौतुक केलं, तर काहींनी याला ‘मूड लिफ्टर’ असं संबोधलं. यामुळे हे स्पष्ट झालं की, ‘Tu Hi Re Majha Mitva’ केवळ कथानकामुळेच नाही, तर कलाकारांच्या या मोकळ्या आणि मनमोकळ्या स्वभावामुळेही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवत आहे.
हे पण वाचा..Bigg Boss 19 मध्ये उपेंद्र लिमयेचा सहभाग? चर्चांना पूर्णविराम देत अभिनेत्याने दिलं स्पष्ट उत्तर









