tu he re maza mitwa madhye nava twist arnav rakesh samorasamora : लोकप्रिय मराठी मालिका ‘Tu He Re Maza Mitwa’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. काही दिवसांपासून मालिकेतील कथा अधिक रंजक व तणावपूर्ण बनत चालली असून अर्णव, ईश्वरी आणि राकेश यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात तिन्ही पात्रांच्या आयुष्यात मोठा बदल होणार असल्याचे संकेत स्पष्टपणे दिसून येतात.
प्रोमोमध्ये राकेश ईश्वरीला घरी एकटी आढळते आणि तिच्याकडे वाईट हेतूने पुढे सरकतो. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसतात. मात्र, याच क्षणी अर्णव अचानक तेथे पोहोचतो आणि राकेशला मागून पकडतो. ईश्वरी अर्णवला पाहताच त्याच्या मिठीत शिरते आणि भावनिक क्षण तयार होतो. पण राकेश तिथेच थांबत नाही, तो त्यांच्यावर झेपावतो. अर्णव मात्र शांत बसत नाही; तो राकेशच्या गळ्याला धरतो आणि संतापाने म्हणतो, “ती माझी बायको आहे… तुझ्यामुळे तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं तर पकडलेला गळा तुझा श्वास बंद झाल्याशिवाय सोडणार नाही.”
या एका डायलॉगनेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मालिकेच्या चाहत्यांमध्ये आता चर्चांना उधाण आले आहे की पुढे नेमकं काय होणार. कारण काही दिवसांपूर्वीच ईश्वरीला राकेशचा खरा चेहरा समजला होता. राजेश आणि राकेश ही एकच व्यक्ती असल्याचं सत्य समोर आल्यानंतर ईश्वरी पूर्णपणे हादरली होती. तिचा अर्णववर असलेला राग आता हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि त्यांच्या नात्यात मैत्रीचे सूर उमटत आहेत.
मालिकेत काही दिवसांपूर्वीच अर्णव आणि ईश्वरीचे लग्न झाले होते. मात्र ईश्वरी अर्णववर रागावलेली होती कारण तिला वाटत होतं की तिच्या वडिलांच्या अपघाताला अर्णव जबाबदार आहे. पण नंतर उघड झालं की अपघात राकेशने घडवून आणला आणि त्यासाठी अर्णवची गाडी वापरली. या गैरसमजामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. आता मात्र सत्य बाहेर आल्यानंतर परिस्थिती बदलताना दिसते आहे.
हे पण वाचा.. अखेर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत अमृताचं लग्न उदयसोबत; कावेरीसमोर नवा ड्रामा!
या सर्व घडामोडींमुळे ‘Tu He Re Maza Mitwa’ या मालिकेत प्रेक्षकांना एक नवा रोमांचक टप्पा पाहायला मिळणार आहे. राकेशचा मुखवटा पूर्णपणे कधी गळून पडतो आणि अर्णव-ईश्वरीचे नाते कोणत्या दिशेने जाते, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नवीन प्रोमोने मालिकेचा पुढील भाग अधिक रोचक बनवला आहे, हे निश्चित.
हे पण वाचा.. मुंबईच्या ट्राफिकमध्ये ५ तास अडकलेली श्रेया बुगडे, इन्स्टाग्रामवर व्यक्त केला संताप









