ADVERTISEMENT

ना शाहरुख, ना सलमान; त्रिशा ठोसरच्या मनात घर करून बसला ‘हा’ मराठी अभिनेता, महेश मांजरेकरही झाले खुश!

treesha thosar favourite marathi actor : राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार त्रिशा ठोसरने तिच्या आवडत्या अभिनेत्याचं नाव घेताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. शाहरुख, सलमान नव्हे, तर एका मराठी अभिनेत्याने या चिमुकलीचं मन जिंकलं आहे.
treesha thosar favourite marathi actor

treesha thosar favourite marathi actor : ‘नाळ २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी बालकलाकार त्रिशा ठोसर (Treesha Thosar) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आणि तिच्या गोड व्यक्तिमत्त्वाने संपूर्ण देश तिचा चाहता बनला. केवळ सहा वर्षांची असलेली ही चिमुकली मंचावर साडी नेसून आत्मविश्वासाने उभी राहिली होती. तिच्या निरागसतेने आणि सहज बोलण्याने उपस्थित सर्वांनाच भारावून टाकलं.

या सोहळ्यादरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्रिशाच्या निरागसतेने प्रभावित झालेले अनेक कलाकार तिचं कौतुक करत आहेत. आता हीच चिमुकली दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटात त्रिशाची भूमिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा भावेल, अशी चर्चा रंगत आहे.

या चित्रपटाच्या टीमने अलीकडेच ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या डिजिटल अड्ड्याला हजेरी लावली. यावेळी त्रिशाशी गप्पा मारताना तिला विचारण्यात आलं की, “राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला आलेल्या सेलिब्रिटींपैकी तू कोणाला भेटलीस का?” या प्रश्नावर त्रिशाने हसत उत्तर दिलं, “हो, मी राणी मुखर्जी मॅम, मोहनलाल सर, शाहरुख खान सर आणि विक्रांत मॅसी सर यांना भेटले. विक्रांत सर माझ्या आईचे फेव्हरेट आहेत.”

पुढे तिला विचारलं गेलं, “पण तुझे फेव्हरेट कोण?” तेव्हा त्रिशाने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं – “रितेश देशमुख!” तिचं हे उत्तर ऐकताच उपस्थित सर्वजण टाळ्यांच्या गजरात आनंदित झाले. महेश मांजरेकर यांनीही हसत म्हटलं, “याला म्हणतात खरी मराठी बाणा!”

या उत्तराने सिद्ध झालं की त्रिशा ठोसर फक्त टॅलेंटेडच नाही तर मराठी सिनेसृष्टीबद्दल तिच्या मनात आदरही आहे. महेश मांजरेकरांनी तिचं कौतुक करताना सांगितलं की, “अशा पिढीतील मुलं जर मराठी अभिनेते आदर्श मानत असतील, तर मराठी चित्रपटसृष्टीचं भविष्य नक्की उज्ज्वल आहे.”

हे पण वाचा.. घरच्या ‘लक्ष्मी’चं औक्षण करत रितेश देशमुखने साजरा केला दिवाळी पाडवा; खास व्हिडिओने जिंकली मनं

दरम्यान, या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्रिशासह कबीर खंदारे, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप या मराठी बालकलाकारांनीही बाजी मारली. त्रिशा या सर्वांमध्ये वयाने सर्वात लहान असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः तिचं कौतुक करून तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

त्रिशा ठोसर ही केवळ बालकलाकार नाही, तर मराठी सिनेसृष्टीचं उज्ज्वल भविष्य आहे हे या पुरस्काराने पुन्हा अधोरेखित झालं आहे.

हे पण वाचा.. श्रेया बुगडे कुलदेवीच्या दर्शनाला; दिवाळी पाडव्याच्या खास क्षणांचे फोटो चाहत्यांमध्ये चर्चेत

treesha thosar favourite marathi actor