Titeeksha Tawade Siddharth Bodke Love Journey : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आणि चर्चेत असलेलं कपल म्हणजे TiteekshaTawade आणि सिद्धार्थ बोडके. सोशल मीडियावर सतत एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत ही जोडी चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरते. फेब्रुवारी २०२४ मध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं, मात्र या लग्नामागे एक समजूतदार आणि प्रामाणिक प्रेमप्रवास आहे, जो त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितला.
तितीक्षा आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट ‘झी मराठी’वरील ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्या वेळी दोघेही सहाय्यक भूमिकांमध्ये होते. कामाच्या निमित्ताने ओळख झाली आणि हळूहळू संवाद वाढत गेला. काही वर्षांनंतर ‘झी युवा’वरील ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत दोघांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याच काळात त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि कोविडच्या काळात एकमेकांविषयीच्या भावना अधिक स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं.
मुलाखतीदरम्यान TiteekshaTawade आणि सिद्धार्थ यांनी लग्नापूर्वी दोन वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही स्पष्टपणे सांगितलं. तितीक्षाच्या मते, त्यांच्या नात्याबद्दल दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती होती आणि कुणाचाही त्याला विरोध नव्हता. सिद्धार्थच्या कामाबद्दल तिच्या घरच्यांना आदर होता, तर तितीक्षाला त्याच्या कुटुंबाकडूनही तसंच प्रेम मिळालं.
लिव्ह-इनची सुरुवात अगदी सहजपणे झाली. सुरुवातीला एका दिवसासाठी राहायला गेलेली तितीक्षा हळूहळू सिद्धार्थकडेच राहायला लागली आणि दोन वर्ष दोघांनी एकत्र संसाराचा अनुभव घेतला. या काळात एकमेकांचा स्वभाव, आवडी-निवडी, मतभेद आणि संवाद या सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्याची संधी मिळाली, असं सिद्धार्थने सांगितलं.
दोघांच्या मते, एकत्र राहिल्यामुळे लग्नाबाबतचा निर्णय अधिक ठाम झाला. कोणताही दबाव न घेता त्यांनी स्वतःच लग्नाची तारीख ठरवली, मुहूर्त पाहिला आणि साध्या पद्धतीने विवाह केला. त्यांच्या मते, संवाद, परस्पर आदर आणि समजूतदारपणा यामुळेच हा प्रवास सुंदर झाला.
हे पण वाचा.. हनिमूनसाठी जात असताना जय दुधाणे अटकेत; अटकेनंतर म्हणाला – सत्य लवकरच समोर येईल
आज TiteekshaTawade आणि सिद्धार्थ बोडके यांची जोडी अनेकांसाठी एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे. प्रेम, मैत्री आणि परिपक्व निर्णय यांचा सुंदर संगम म्हणजे त्यांची ही लव्हस्टोरी, असंच म्हणावं लागेल.
हे पण वाचा.. सोनाली पाटीलच्या कुटुंबावर शोककळा अभिनेत्रीच्या आजोबांचं निधन, भावुक पोस्टमधून व्यक्त केल्या भावना







