titeeksha tawade emotional post for khushboo tawade : मराठी मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री तितीक्षा तावडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. कामाबरोबरच ती तिच्या कुटुंबातील खास क्षण चाहत्यांशी शेअर करत असते. नुकतंच तिनं तिची मोठी बहीण व मराठी मनोरंजनविश्वातील ओळखलेली अभिनेत्री खुशबू तावडे हिच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
५ सप्टेंबर रोजी खुशबू तावडेनं आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्त तितीक्षानं सोशल मीडियावर खास फोटोंसह भावपूर्ण शब्दांत बहिणीबद्दलचं मनोगत व्यक्त केलं. तिनं लिहिलं – “सोना, लहानपणी मला जेव्हा कोणी विचारायचं की मोठं झाल्यावर काय होणार, तेव्हा मी गोंधळायचे. पण आता मात्र या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे – मला मोठं होऊन तुझ्यासारखं व्हायचंय. तुझ्याकडून मला खूप प्रेरणा मिळते. आय लव्ह यू.”
तितीक्षाच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. खुशबू तावडेनं स्वतः “थँक यू” असं लिहित बहिणीच्या या प्रेमळ संदेशाला उत्तर दिलं. याखेरीज अभिनेत्री रेश्मा शिंदे, सुरुची अडारकर, सिद्धार्थ बोडके, नम्रता संभेराव, योगिता चव्हाण, निखल बने यांसारख्या कलाकारांनीही कमेंट करून खुशबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हे पण वाचा.. “लग्नाच्या प्रश्नावर जुई गडकरीचं भन्नाट उत्तर; चाहत्यांचं हसू अनावर” काय म्हणाली अभिनेत्री
फक्त तितीक्षा तावडेनंच नाही तर अभिनेता सिद्धार्थ बोडके यानंही खुशबू तावडेसाठी खास पोस्ट शेअर केली. त्यात त्यानं लिहिलं – “एक व्यक्ती एकाच वेळी विनोदी, निडर, उत्तम आणि सुंदर असू शकते हे तू दाखवून दिलंस. तुझ्या आयुष्यात असंच यश आणि आनंद येत राहो, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.”
तितीक्षा तावडे आणि खुशबू तावडे ही दोन्ही बहिणी मालिकांमधून प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे परिचित आहेत. एकमेकींमधील घट्ट नातं आणि परस्परांचं कौतुक या दोघी वारंवार सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. बहिणीच्या वाढदिवसानिमित्त तितीक्षानं केलेली पोस्ट पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची उब चाहत्यांसमोर आणते.
हे पण वाचा.. “‘लग्न करणार का?’…फोनवर रात्री ११ वाजता केल प्रपोज; किशोरी शहाणे यांनी सांगितली त्यांच्या लव्हस्टोरीची फिल्मी आठवण









