tharl tar mag priya adiraj trap arjun sayali plan : ‘ठरलं तर मग’ ही लोकप्रिय मालिका सध्या अत्यंत उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे. कथानकात सतत घडणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे, आता मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होत असून त्यामुळे कथा आणखी रंगतदार होणार आहे.
सध्या मालिकेत अर्जुन आणि सायली हे दोघंही प्रियाचं खरं रूप जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रियाने आतापर्यंत अनेक कारस्थानं रचून त्यांना अडचणीत टाकलं आहे. इतकंच नव्हे तर तिने त्यांच्या जीवावरही बेतणारा प्लॅन आखला होता. मात्र, अर्जुन आणि सायली सुदैवाने या संकटातून बचावतात. ते जिवंत असल्याचं पाहून प्रियाचा सगळा प्लॅन कोलमडतो.
प्रियाची पैशासाठी काहीही करण्याची तयारी अर्जुन आणि सायलीला चांगलीच माहिती आहे. तिने केलेल्या खोट्या गोष्टी आणि तिचं खोटं वागणं उघड करण्यासाठी हे दोघंही एक मोठा डाव आखतात. यासाठी अर्जुन एका नव्या व्यक्तीची मदत घेतो. या नव्या पात्रामुळे कथानकात मोठा बदल घडतो.
मालिकेत ‘अधिराज’ नावाचं हे नवीन पात्र दाखल झालं असून ही भूमिका अभिनेता गुरु दिवेकर साकारत आहेत. त्यांच्या आगमनामुळे कथेत नवा रंग भरला आहे. अधिराज हा अतिशय श्रीमंत व्यक्ती असल्याचं दाखवलं जातं. त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, हे ऐकून प्रियाच्या डोळ्यांसमोर पुन्हा पैशाचं स्वप्न उभं राहतं.
अधिराजच्या संपत्तीबद्दल ऐकताच प्रिया त्याच्याकडे आकर्षित होते. इतकंच नाही तर ती स्वतःच्या वैवाहिक नात्याचाही विचार न करता पुढे पाऊल टाकते. ती गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि अधिराजशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. त्याला भेटताना ती स्वतःच्या आयुष्याबद्दल खोट्या गोष्टी सांगते—आई-वडिलांच्या आजारपणाच्या बनावट कथा रचते.
हे पण वाचा.. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन; सुरेल आवाजाचा सुवर्णकाळ संपला
पण, तिचं हे सगळं नाटक अर्जुन गुपचूप रेकॉर्ड करत असतो. या सगळ्या घटनांमुळे प्रियाचा खरा चेहरा उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्जुन आणि सायलीचा प्लॅन हळूहळू यशस्वी होताना दिसतो आहे.
tharl tar mag priya adiraj trap arjun sayali plan
आता पुढे काय होणार? प्रियाचा हा खोटेपणा सर्वांसमोर येईल का? आणि अश्विनसमोर तिचं खरं रूप उघड होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
हे पण वाचा.. राखी सावंतचा ‘Bigg Boss Marathi Season 6’ मधील प्रवास संपला
‘ठरलं तर मग’ ही मालिका दररोज स्टार प्रवाहवर प्रसारित होत असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत आहे. नवीन पात्राच्या एन्ट्रीमुळे आता मालिकेची रंगत आणखी वाढणार यात शंका नाही.









