ADVERTISEMENT

Tharala Tar Mag : साक्षी जिवंत असल्याचं सायलीला कळलं, ब्रेकफास्ट डेटवरच मोठा धक्का

tharala tar mag sakshi jivant sayli la kalal : ठरलं तर मग मालिकेच्या ६ फेब्रुवारीच्या भागात सायलीला साक्षी जिवंत असल्याचं सत्य समजतं, तर एका साध्या ब्रेकफास्ट डेटवरच प्रचंड नाट्य घडतं.
tharala tar mag sakshi jivant sayli la kalal

tharala tar mag sakshi jivant sayli la kalal : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag च्या ६ फेब्रुवारीच्या भागाने प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून सोडलं. आतापर्यंत मृत समजली गेलेली साक्षी जिवंत असल्याचं सत्य सायलीसमोर येतं आणि कथेला अनपेक्षित वळण मिळतं. एकीकडे कुटुंबातील नातेसंबंध, तर दुसरीकडे गुपितांची जाळी अधिक घट्ट होताना या भागात पाहायला मिळते.

भागाची सुरुवात सायलीच्या अस्वस्थतेने होते. कल्पनाने अचानक तिला आणि अर्जुनला खोलीत बोलावल्यामुळे सायलीच्या मनात भीती निर्माण होते. आईने तिला किचनमध्येही जाऊ दिलं नाही, यामुळे काहीतरी गंभीर घडणार याची चाहूल तिला लागते. मात्र कल्पना आणि प्रताप यांचा उद्देश वेगळाच असतो. अर्जुन सतत कामात गुंतलेला असून पत्नीला वेळ देत नाही, याची जाणीव करून देत दोघेही सायली-अर्जुनला एकत्र वेळ घालवण्याचा सल्ला देतात. अखेर त्यांच्या आग्रहामुळे दोघं ब्रेकफास्ट डेटसाठी बाहेर पडतात.

सायली छान तयार होऊन आल्यावर अर्जुन पूर्णपणे तिच्या प्रेमात हरवलेला दिसतो. डेटची सुरुवात रोमँटिक होते, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. त्याच रेस्टॉरंटमध्ये सचिन आणि साक्षीही येतात. स्वतःची ओळख लपवण्यासाठी साक्षी मास्क घालते, मात्र सचिनच्या मनात शंका घर करून जाते. “अजून किती दिवस असं लपून राहणार?” हा प्रश्न त्याला अस्वस्थ करतो.

रेस्टॉरंटमध्येच सायली आणि साक्षीचा क्षणिक सामना होतो. साक्षीचा लूक बदललेला असल्यामुळे सायलीला सुरुवातीला खात्री वाटत नाही, पण डोळ्यांमधून तिला ओळख पटते. धक्का बसलेल्या सायलीच्या मनात एकच विचार घोळत राहतो – साक्षी जिवंत आहे. ती तिच्या मागे धाव घेते, अर्जुनही तिच्या पाठोपाठ जातो. मात्र अर्जुनला हे मान्य होत नाही. साक्षीचा मृत्यू, कबुली आणि पुरावे आठवत तो सायलीवर विश्वास ठेवत नाही. तरीही सायलीचा अंतर्मन तिला स्वस्थ बसू देत नाही.

दुसरीकडे साक्षी घाबरलेली असून अर्जुनने आपल्याला पाहिलं नसेल ना, याच विचारात ती सचिनपासूनही दूर जाते. या सगळ्या गोंधळात रविराज प्रियाला टोमणे मारतो, तर घरातील वातावरण अधिक तणावपूर्ण होत जातं.

हे पण वाचा.. सायंकाळी ७ नंतर काहीही खाऊ नका! अभिनेत्री माधवी निमकरची फिटनेस टिप्स

Tharala Tar Mag चा हा भाग सायलीसाठी निर्णायक ठरतो. साक्षी खरंच जिवंत आहे का, अर्जुनला सत्य कधी समजणार आणि हे गुपित किती काळ लपून राहणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना पुढील भागापर्यंत लागून राहणार आहे.ी

हे पण वाचा.. मी तुला यात क्षणोक्षणी… – देवमाणूस फेम अपर्णा क्षेमकल्याणी यांनी ऑनस्क्रीन लेकासाठी विणलेला मफलर; रोहित भोसलेची भावुक पोस्ट चर्चेत