tharala tar mag purna aji sadashiv mainawati theft promo updates : ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) मालिकेच्या कथानकात सतत नवे ट्विस्ट पाहायला मिळत असताना आता सुभेदारांच्या घरात घडलेली मोठी चोरी आणि पूर्णा आजीवर आलेला धोका यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सायलीच्या आयुष्यात आधीच उलथापालथ सुरू असताना तिचे आई-बाबा म्हणून ओळखले जाणारे सदाशिव आणि मैनावती खरे नसल्याची शंका तिला सतत सतावत असते. डीएनए अहवाल जुळल्यानंतर तिचा गोंधळ अधिक वाढला; परंतु मधुभाऊंच्या सूचक संकेतामुळे तिच्या मनातील संशयाला खऱ्या अर्थाने पुष्टी मिळते. हाच निर्णायक क्षण ठरून सायली आणि अर्जुन या दोघांच्या मनात सदा आणि मैना यांच्या कपटी स्वभावाविषयी अधिक राग निर्माण होतो.
या सर्व गोंधळात सायली आणि अर्जुन सदा-मैनाला त्यांच्या कृत्यांचा योग्य प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतात. मात्र, सुभेदारांच्या घरात याच काळात एक अनपेक्षित घटना घडते. संधी साधत सदाशिव आणि मैनावती थेट घरात येतात आणि पूर्णा आजीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करतात. वयामुळे आधीच अशक्त असलेल्या पूर्णा आजीला औषधाचा त्वरित परिणाम होतो आणि त्या शुद्धीवर नसतात. याच अवस्थेत दोघंही कपाटातून दागिने आणि मौल्यवान वस्तू काढून चोरी करण्याचा बेत आखतात. काळ्या कपड्यांतील त्यांचा वावर एखाद्या व्यावसायिक चोरासारखाच दिसत होता.
पण सायलीच्या नजरेतून काहीच सुटत नाही. बंगल्यासमोर सावली दिसताच ती मोठ्याने आवाज देते आणि कुटुंबातील सर्व सदस्य त्वरित धाव घेतात. अर्जुनही तिच्या मागे येत दोघांना घरातच गाठतो. शेवटी चेहऱ्यावरील मास्क काढल्यावर सदाशिव आणि मैनावतीचे खरे रूप सर्वांसमोर स्पष्ट होते. सायलीच्या तल्लख निरीक्षणामुळे आणि अर्जुनच्या तत्परतेमुळे हा मोठा अनर्थ टळतो.
हे पण वाचा.. सूरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घराचा गृहप्रवेश; प्रशस्त बंगल्याची झलक पाहून चाहते भारावले
आता पुढील भागात अर्जुन या दोघांवर कोणती कारवाई करणार, पूर्णा आजी कधी शुद्धीवर येणार आणि सायली या घटनेनंतर कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांच्या शिगेला पोहोचली आहे. ठरलं तर मग मालिकेतील हा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत आहे.
हे पण वाचा.. जुई गडकरीचा ‘नो मेकअप’ लूक टेस्ट फोटो व्हायरल; सायलीच्या भूमिकेची निवड कशी झाली ते जाणून घ्या!









