Tharala Tar Mag new twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘Tharala Tar Mag’ ने गेल्या तीन वर्षांपासून टीआरपीमध्ये आपलं प्रभावी स्थान टिकवून ठेवलं आहे. प्रेक्षकांना घरातील सुभेदार कुटुंबातील प्रत्येक पात्राशी एक वेगळं नातं जुळलेलं जाणवतं. नुकत्याच आलेल्या वात्सल्य आश्रम केसभोवती फिरणाऱ्या कोर्टरूम ड्रामाने मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्या अंतिम भागाला मिळालेला विक्रमी टीआरपी हा या मालिकेच्या लोकप्रियतेचा पुरावा ठरला.
आता पुन्हा एकदा ‘Tharala Tar Mag’ टीम नवा ट्विस्ट घेऊन सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहने नुकताच शेअर केलेल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये “महाराष्ट्राच्या महामालिकेत उलगडणार महारहस्य” असा उल्लेख करत प्रेक्षकांच्या कुतूहलाला चांगलंच चाळवलं आहे. या ट्विस्टनंतर मालिकेत अनेक नवे पैलू उलगडतील, अशी चर्चाही चाहत्यांमध्ये रंगली आहे.
चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती सायलीच्या भूतकाळाबाबत. मालिकेत तिची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर सेटवरील आऊटडोअर शूटचे काही फोटो शेअर केले आहेत. या लोकेशनमुळे २२ वर्षांपूर्वी घडलेल्या रविराज-प्रतिमाच्या अपघाताची आठवण ताजी झाली. जिथे तो अपघात झाला होता, त्याच ठिकाणी पुन्हा शूटिंग सुरू असल्याने या घटनेमागचं गूढ लवकरच उलगडणार, अशी प्रबळ शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे, या सर्व गोष्टींचा धागा महिपतशी जोडला जाईल, अशाही चर्चा सोशल मीडियावर आहेत.
जुईने दाखवलेल्या स्टोरीजमध्ये मालिकेचं शूट किती कष्टाचं आहे हेही स्पष्ट दिसतं. पहाटे १.२१ वाजता सुरू झालेलं शूट अखेर सकाळी ७.१० वाजता पूर्ण झालं. “येणारे एपिसोड एकही मिस करू नका,” असा संदेश देत तिने चाहत्यांना अजूनच उत्सुक केलं आहे. मालिकेच्या टीमची मेहनत आणि समर्पण पाहता पुढील काही भागांमध्ये प्रेक्षकांसमोर एक दमदार खुलासा येईल, यात शंका नाही.
हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत मल्लिकाच्या डावामुळे स्वानंदीच्या कुटुंबावर नवं संकट, पुढे काय होणार?
दरम्यान, कथानकात अर्जुन आणि सायली प्रतिमा आत्याच्या भूतकाळाचा धागा पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. जुने अपघात, दडलेलं रहस्य आणि यामागील लोकांची खरी ओळख—हे सर्व उलगडलं की ‘Tharala Tar Mag’ चाहत्यांसाठी नक्कीच मोठा धक्का आणि तितकाच रोमांचक अनुभव असेल. आगामी भागांत नेमकं कोणतं रहस्य फोडलं जाणार, याची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना लागली आहे.
हे पण वाचा.. शुभ विवाह मालिकेत रागिणी पटवर्धनची जोरदार पुनरागमन एन्ट्री; अपूर्वाच्या डावाला मिळाला मोठा धक्का!









