tharala tar mag new purna aaji entry : लोकप्रिय मराठी मालिका ‘Tharala Tar Mag’ प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करून गेली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांवर एक वेगळी छाप पाडली असून पूर्णा आजींचं पात्र तर विशेष आवडतं बनलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी मालिकेत पूर्णा आजींची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्र शोकाकुल झालं. त्यांच्या जाण्यानंतर मालिकेच्या पुढील कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू होती.
कथानकात पूर्णा आजींचं पात्र अत्यंत महत्त्वाचं असल्याने प्रोडक्शन टीमसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरून ही भूमिका दुसऱ्या कोणालाही देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र वाहिनी व प्रोडक्शन टीमने कथानकाच्या प्रवाहानुसार हा निर्णय घ्यायचा ठरवलं. परिणामी, मालिकेत पूर्णा आजींच्या पात्रासाठी नवीन अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.
स्टार प्रवाहने मालिकेच्या सेटवर नव्या पूर्णा आजींच्या आगमनाची झलक सोशल मीडियावर शेअर केली. व्हिडिओ पोस्ट होताच चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली. वाहिनीने अद्याप अधिकृतरित्या अभिनेत्रीचं नाव जाहीर केलं नसतानाही नेटकऱ्यांनी त्या अभिनेत्रीचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. अनेक कमेंट्समध्ये या नव्या अभिनेत्री दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्याही नसून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी असल्याचं नमूद केलं आहे.
सुभेदारांच्या अन्नपूर्णा निवासात पूर्णा आजींची एन्ट्री लवकरच दिसणार असून प्रेक्षक या नव्या ट्विस्टकडे डोळे लावून बसले आहेत. ‘Tharala Tar Mag’ मालिकेचं कथानक कुटुंब, नाती, भावनांचा संगम मांडत असल्याने पूर्णा आजींचं पात्र प्रेक्षकांसाठी विशेष आहे. त्यामुळे नव्या अभिनेत्रीवर मोठी जबाबदारी असेल.
अनेक वर्षांच्या अनुभवाची झळाळी असलेल्या या नव्या ज्येष्ठ अभिनेत्री पूर्णा आजींचं पात्र नव्या रंगात रंगवणार का? आणि प्रेक्षक त्यांना ज्योती चांदेकर यांच्या जागी स्वीकारतील का? हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये ही एन्ट्री नेमकी कशी साकारली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. Paaru Savlyachi Janu Savali ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’चा महासंगम – उलगडणार जुन्या गुन्ह्याचं रहस्य
‘Tharala Tar Mag’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात रुजली असून प्रत्येक नवीन ट्विस्टमुळे ती अधिक रंगतदार होत आहे. पूर्णा आजींच्या भूमिकेत आलेली ही रिप्लेसमेंट मालिकेच्या कथानकाला नवा वळण देणार, यात शंका नाही.
हे पण वाचा.. मानसी नाईक एक्स पती प्रदीप खरेराचा व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले “हा माणूस…”









