ADVERTISEMENT

‘tharala tar mag’ मालिकेत दोन नव्या कलाकारांची एंट्री; कथानकात रंगणार भन्नाट ट्विस्ट!

tharala tar mag new actors twist : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अलीकडेच दोन दमदार कलाकारांची एंट्री झाली आहे. राजन जोशी आणि किर्ती पेंढारकर यांच्या आगमनामुळे सायली–अर्जुनच्या आयुष्यात नवं पान उलगडणार आहे. मालिकेचं कथानक आता अधिकच रोचक बनलं आहे.
tharala tar mag new actors twist

tharala tar mag new actors twist : लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या ठरलं तर मग मध्ये अलीकडेच प्रेक्षकांसाठी एक मोठा सरप्राइज देण्यात आला आहे. या मालिकेत दोन नवे कलाकार दाखल झाले असून त्यांच्या एन्ट्रीमुळे मालिकेचं कथानक पूर्णपणे बदलणार आहे. अनेक दिवसांपासून अर्जुन सायलीच्या आई-वडिलांचा शोध घेत असल्याचं दाखवलं जातंय. मधुभाऊंमुळे अर्जुनला सायलीचे आई-बाबा जिवंत असल्याचं समजतं. मात्र सायली किल्लेदारांच्या घरातील मुलगी आहे हे गूढ अद्याप कोणालाही समजलेलं नसतं.

दरम्यान, प्रियाने सायलीचं बालपणीचं गाठोडं अदलाबदल करून मोठं रहस्य लपवलेलं असतं. याच गाठोड्यामुळे संपूर्ण कहाणी नवं वळण घेते. अर्जुन सायलीच्या भूतकाळाचा मागोवा घेताना प्रियाच्या खऱ्या आई-वडिलांपर्यंत पोहोचतो. त्यावेळी त्याला सदाशिव व श्रद्धा लोखंडे यांची भेट होते आणि तो यांनाच सायलीचे आई-बाबा समजतो. तो दोघांनाही सुभेदारांच्या घरी घेऊन येतो. इतक्या वर्षांनंतर आई-बाबा समोर आल्याने सायलीच्या आयुष्यात भावनांचा पूर येतो. पण प्रियाला मात्र हे सत्य आधीपासूनच माहीत असतं — हे तिचेच खरे आई-बाबा आहेत!

या कथानकात जी दोन नवी पात्रं आली आहेत त्यांची भूमिका अनुभवी कलाकार साकारत आहेत. सदाशिव लोखंडेची भूमिका लोकप्रिय अभिनेते Rajan Joshi साकारत आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ‘रमा राघव’ या मालिकेत त्यांनी राघवच्या वडिलांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिली होती. तर श्रद्धा लोखंडे ही व्यक्तिरेखा साकारत आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री Kirt Pendharkar. तिला ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेमुळे घराघरात ओळख मिळाली होती. याशिवाय ती काही मराठी चित्रपटांमध्येसुद्धा झळकली आहे.

आता या दोघांच्या आगमनामुळे ठरलं तर मग मध्ये प्रेक्षकांना एक मोठा कलाटणी देणारा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सदाशिव आणि श्रद्धा यांच्या आगमनानंतर सायलीचं आयुष्य नेमकं कोणत्या दिशेने जाणार, प्रियाचं गुपित केव्हा उघड होणार आणि अर्जुनला खरी सत्यता समजणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. “मी रोज विग घालते…” हिना खानचं भावूक वक्तव्य; ‘पती पत्नी और पंगा’च्या स्टेजवर सोनाली बेंद्रेसह ओघळले अश्रू

प्रेक्षकांमध्ये या कथानकाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मालिकेतील नाट्यमय घटनांनी TRP मध्येही भरारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येणाऱ्या भागांमध्ये सायली-अर्जुनच्या आयुष्यात काय वादळं येतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे ‘Tharala Tar Mag’ च्या चाहत्यांसाठी पुढचे काही दिवस अधिकच थरारक ठरणार आहेत.

हे पण वाचा.. ‘अबोली’ मालिकेचा शेवटचा अध्याय! चार वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’वरून घेणार निरोप, पार पडली Wrap Up पार्टी

tharala tar mag new actors twist