ADVERTISEMENT

चुकीला माफी नाही! ठरलं तर मग मध्ये नागराज जामीनावर सुटला; सायली-अर्जुन उचलणार कठोर पाऊल?

tharala tar mag nagraj gets bail sayali arjun opposition : ठरलं तर मग मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. २२ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात नागराज जामीनावर सुटतो, पण सायली-अर्जुन त्याला मोकळं सोडणार का?
tharala tar mag nagraj gets bail sayali arjun opposition

tharala tar mag nagraj gets bail sayali arjun opposition : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag सध्या प्रचंड ट्विस्ट आणि थरारक घडामोडींमुळे चर्चेत आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं की, सुमनने अफाट हुशारीने नागराजचा खरा चेहरा उघड केला. वेड लागल्याचं नाटक करत तिने नागराजला बेसावध केलं आणि त्याच्याकडून स्वतःच्या तोंडानेच पापाची कबुली काढून घेतली. २२ वर्षांपूर्वी प्रॉपर्टीसाठी रविराज-प्रतिमाच्या अपघातामागे आपणच असल्याचं नागराजने कबूल केलं आणि हाच क्षण सुमनने लपवलेल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

ही कबुली सायली आणि अर्जुनपर्यंत पोहोचणार, असं चित्र पुढील भागांमध्ये दिसत असतानाच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आणि प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. Tharala Tar Mag च्या या प्रोमोमध्ये नागराजला तुरुंगवास झाल्याचं दाखवण्यात आलं असलं, तरी काही वेळातच तो जामीनावर सुटतो. कोर्टातून “पुराव्याअभावी” सुटका झाल्याचा आदेश ऐकू येताच अनेक प्रश्न उपस्थित होतात. इतकं सगळं समोर येऊनही नागराज बाहेर कसा आला, असा सवाल प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

तुरुंगाबाहेर येताच नागराजला अर्जुन थेट अडवतो आणि त्याला जमिनीवर पाडतो. याच क्षणी सायली, सुमन आणि प्रतिमा तिथे पोहोचतात. सायली ठाम शब्दांत नागराजला सांगते की, २२ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून तू सुटू शकतोस, पण बायकोवर केलेल्या अत्याचारातून नाही. ती तात्काळ इन्स्पेक्टरला एफआयआर नोंदवण्याचा आदेश देते. या प्रसंगात प्रतिमा, सुमन आणि अर्जुन सायलीच्या पाठीशी उभे राहताना दिसतात. “नागराजविरोधात ठाम उभी राहिलेली स्त्रीशक्ती” असा संदेश देणारा हा प्रोमो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

मात्र, Tharala Tar Mag च्या या वळणावर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कथानक अनावश्यकपणे लांबवलं जात असल्याची नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी पुरावे असूनही नागराज जामीनावर कसा सुटतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे. टीआरपीसाठी कथा ताणली जात असल्याची टीकाही करण्यात येत आहे.

हे पण वाचा.. तुझ्या सोबतीने मधील नुपूर खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते थक्क

आता पुढील भागांमध्ये सायली-अर्जुन नागराजविरोधात काय पाऊल उचलणार, स्त्रीशक्तीचा हा लढा त्याला कायमचा अडवणार का, हे पाहणं Tharala Tar Mag च्या प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. लग्नानंतर होईल प्रेम : जीवा-नंदिनीची लव्ह स्टोरी पुन्हा फुलणार? पार्थ-काव्यामधील दुरावा कायमच

tharala tar mag nagraj gets bail sayali arjun opposition