ADVERTISEMENT

Tharala Tar Mag : 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश, नागराजला अटक; भावाच्याच विश्वासघाताने रविराज हादरला

tharala tar mag nagraj arrest episode twist : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेच्या 31 जानेवारी 2026 च्या भागात अखेर नागराजच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश होतो. 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य समोर येताच संपूर्ण किल्लेदार कुटुंब हादरून जातं.
tharala tar mag nagraj arrest episode twist

tharala tar mag nagraj arrest episode twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. 31 जानेवारी 2026 च्या भागात प्रेक्षकांनी असा धक्कादायक प्रसंग पाहिला की ज्यामुळे संपूर्ण कथानकच बदलून गेलं. आतापर्यंत स्वतःला अतिशय हुशार समजणाऱ्या नागराजच्या हाती अखेर पोलिसांच्या बेड्या पडतात आणि 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातामागचं भयावह सत्य उघड होतं.

आजच्या भागाची सुरुवात नागराज निवांत बसलेला असतानाच होते. अचानक पोलिसांची धाड त्याच्या घरी पडते. पोलिसांकडून आपणास अटक करण्यासाठी आलो आहोत, असं ऐकताच नागराज गोंधळून जातो. 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या कुटुंबावर झालेल्या अपघाताचा मास्टरमाइंड आपणच असल्याचा आरोप ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. याच वेळी सायली आणि अर्जुन पोलिसांसोबत तिथे पोहोचतात. अर्जुन स्पष्टपणे सांगतो की इतके दिवस शोध घेतल्यानंतर या अपघातामागे नागराज किल्लेदारच असल्याचं सिद्ध झालं आहे.

आपला सख्खा भाऊच आपल्या जीवावर उठला होता, हे सत्य समजताच रविराज हादरून जातो. सुरुवातीला त्याला हे मान्यच होत नाही. नागराज मात्र सर्व आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न करतो. पण सायली सुमनच्या साक्षीचा मुद्दा मांडते. नागराज सुमनला वेडी ठरवण्याचा प्रयत्न करतो, मात्र सुमन ठामपणे सांगते की तिला काहीही विसरलेलं नाही. आपलं अपहरण, महिपत शिखरेसोबत बांधून ठेवल्याची घटना आणि नागराजने स्वतःच आपली पापं कबूल केल्याचं ती सगळ्यांसमोर उघड करते.

सायली स्पष्ट करते की डॉक्टर सुमन वेडी नसल्याचं सिद्ध करण्यासाठीच सहभागी झाले होते. नागराजने तिच्या आजाराचा गैरफायदा घेत स्वतःला सुरक्षित समजलं, पण हाच त्याचा मोठा भ्रम ठरतो. पोलिस सुमनने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवताच नागराजची बोलती बंद होते.

यानंतर Tharala Tar Mag मध्ये अत्यंत भावनिक क्षण पाहायला मिळतो. ज्याला मुलासारखं वाढवलं, त्याच भावाने आपल्या जीवावर उठल्याचं पाहून रविराजचा संताप अनावर होतो. तो नागराजवर हात उचलतो. आपल्या मुलीच्या जीवावरही उठण्याचा आरोप करत तो पोलिसांना नागराजला त्वरित घेऊन जाण्याची मागणी करतो. तरीही नागराज शेवटपर्यंत आपण निर्दोष असल्याचाच आक्रोश करत राहतो.

दरम्यान, सुभेदारांच्या घरी सायली आणि अर्जुन उशिरा परतले नसल्याने काळजीचं वातावरण असतं. तर किल्लेदारांच्या घरी रविराज भूतकाळ आठवत भावनिक होतो. आई-वडिलांनंतर नागराजला कसं सांभाळलं, त्याच्यासाठी काय काय केलं, हे सांगताना त्याचा विश्वास पूर्णपणे तुटलेला दिसतो.

हे पण वाचा.. दादा अनंतात विलीन झाले…” अजित पवार यांच्या निधनावर अश्विनी महांगडेची भावूक प्रतिक्रिया

Tharala Tar Mag चा हा भाग प्रेक्षकांसाठी भावनिक आणि धक्कादायक ठरला असून, पुढील भागांमध्ये अजून कोणती सत्य बाहेर येणार याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.

हे पण वाचा.. लग्नाच्या फोटोवर प्रँक पडला महागात, शिव ठाकरेला आईचा ओरडा आणि लोकांची टीका