ADVERTISEMENT

चार नायिकांची एन्ट्री, सुमनच्या अपहरणाचा क्लू सापडला! ठरलं तर मग मध्ये मोठा खुलासा

tharala tar mag makar sankrant suman kidnapping twist : ठरलं तर मग मालिकेत मकरसंक्रांतीच्या खास भागात अर्जुन-सायलीच्या आनंदावर संकटाचं सावट आहे. चार नायिकांच्या एन्ट्रीमुळे सुमनच्या अपहरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर येणार आहे.
tharala tar mag makar sankrant suman kidnapping twist

tharala tar mag makar sankrant suman kidnapping twist :  स्टार प्रवाहवरील गाजलेली मालिका Tharala Tar Mag सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या काही भागांपासून सुमनच्या अपहरणामुळे किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबात अस्वस्थतेचं वातावरण आहे. सगळीकडे एकच प्रश्न आहे, सुमन नेमकी कुठे आहे आणि तिच्या गायब होण्यामागे कोणाचा हात आहे? या सगळ्या गोंधळात महिपत शिखरे पोलिसांच्या ताब्यात असला तरी तो अजूनही खऱ्या सूत्रधाराचं नाव उघड करत नाही.

प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांच्या २२ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामागचं सत्य अर्जुनला जाणून घ्यायचं आहे. महिपतला सत्य सांगायला भाग पाडण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे, पण महिपत प्रत्येक वेळी टाळाटाळ करत आहे. त्याचवेळी सुमन काकू बेपत्ता असल्याने अर्जुन आणि सायलीची चिंता अधिकच वाढते. अशातच आगामी भागात सुमनबाबतची एक मोठी आणि धक्कादायक माहिती त्यांच्या हाती लागणार आहे.

Tharala Tar Mag मालिकेत पहिल्यांदाच अर्जुन आणि सायली एकत्र मकरसंक्रांत साजरी करताना दिसणार आहेत. हा आनंदाचा क्षण अधिक खास करण्यासाठी स्टार प्रवाहच्या चार लोकप्रिय नायिका मालिकेत एन्ट्री घेत आहेत. शुभविवाहमधील भूमी, लपंडावमधील सखी, साधी माणसंमधील मीरा आणि लग्नानंतर होईलच प्रेममधील काव्या या सगळ्या अर्जुन-सायलीच्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमादरम्यान या चारही नायिका सुमनच्या अपहरणाचा शोध घेताना दिसतात. नागराज आपल्या मोबाईलमध्ये सुमनला कोंडून ठेवलेला व्हिडीओ पाहत असतो. याच क्षणी काव्या प्रसंगावधान राखत त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते. भूमी आणि सखी नागराजला फोटो काढण्याच्या बहाण्याने गुंतवून ठेवतात, तर काव्या अत्यंत हुशारीने त्याच्या मोबाईलमधील सुमनचा व्हिडीओ पाहते.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भूमी, सखी आणि काव्या थेट अर्जुन आणि सायलीकडे जातात. सुमनबद्दलचा हा खुलासा ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसतो. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसून येते. आता सुभेदार सुमनपर्यंत पोहोचू शकणार का, आणि नागराजचं सत्य सगळ्यांसमोर येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. अंकिता वालावलकरची पहिली मकर संक्रांत ठरली अविस्मरणीय; गावात ३५० महिलांसाठी हळदीकुंकू, खास व्हिडीओ व्हायरल

Tharala Tar Mag मालिकेचे हे विशेष भाग १८ आणि १९ जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजता प्रसारित होणार आहेत. सुमन सापडल्यावर ती संपूर्ण सत्य उघड करणार की त्याआधीच आणखी एखादा धक्कादायक ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

हे पण वाचा.. शाई निघेल, पण आवाज नाही दाबला जाणार!” मतदानानंतर तेजस्विनी पंडितची पोस्ट; ‘रक्तात मराठी’ विधानाने चर्चेला उधाण

tharala tar mag makar sankrant suman kidnapping twist