tharala tar mag asmita husband new entry : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) सातत्याने रंगतदार वळण घेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून ठेवत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत प्रियाच्या आई–वडिलांची एन्ट्री झाल्यानंतर आता आणखी एक महत्त्वपूर्ण पात्र कथेत दाखल होत आहे. प्रेक्षकांना ज्या व्यक्तीची सर्वाधिक प्रतीक्षा होती, तो म्हणजे अस्मिताचा पती. आणि विशेष म्हणजे ही भूमिका साकारणार आहे मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील ओळखता चेहरा नकुल घाणेकर.
अस्मिताचा पती सचिन अखेर मालिकेत दाखल होतो आणि थेट सुभेदारांच्या घरात येऊन नजरसामोर उभा राहतो. पण इथेच खरी कहाणी वळण घेते. अस्मिताला भेटण्याआधीच सचिनची भेट होते साक्षी शिखरेशी. सध्या ओळख बदलून ‘समीरा’ नावाने सोशल मीडियावर सक्रिय असलेली साक्षी त्याच्याशी मैत्री करते आणि या भेटीतून दोघांमध्ये संवाद सुरू होतो. साक्षी आपली खरी ओळख लपवत सचिनला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते आणि सचिनही तिच्याकडे ओढला जाताना दिसतो.
दरम्यान, अस्मिताला या सर्व गोष्टींचा पत्ताच नसतो. तिचा नवरा तिच्या आयुष्यात परत येणार याचा आनंद असतानाच दुसरीकडे साक्षी त्याला आपल्या जाळ्यात खेचणार, अशी परिस्थिती मालिकेत पाहायला मिळेल. यामुळे ‘ठरलं तर मग’ च्या कथेत नवीन गुंता निर्माण झाला आहे. साक्षी आणि महिपत पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबाचे आयुष्य ढवळून काढण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.
हे पण वाचा.. घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मास्क मॅन कोण? १४ वर्षांनंतर एक लोकप्रिय अभिनेता पुन्हा पडद्यावर
नकुल घाणेकरच्या आगमनामुळे कथेत आणखी चुरस वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी ‘जय मल्हार’सह अनेक मालिकांत दमदार भूमिका साकारलेल्या नकुलच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अस्मिता–सचिनचं नातं टिकणार की साक्षी त्यांच्यात दरी निर्माण करणार? पुढील भागांमध्ये याचा खुलासा होणार असून, रात्री ८:३० वाजता प्रसारित होणाऱ्या ‘ठरलं तर मग’ च्या एपिसोड्स आता आणखी रंगतदार होणार आहेत.
हे पण वाचा.. सोशल मीडियावर वैयक्तिक टीका; “कपिल होनराव” ची संतप्त प्रतिक्रिया व्हायरल!









