ADVERTISEMENT

अखेर गैरसमज दूर! ठरलं तर मग मालिकेत अर्जुन-सायली पुन्हा मूळ भूमिकेत; माफी, समजूत आणि भावनिक संवाद

tharala tar mag arjun sayali original roles : ठरलं तर मग मालिकेतील व्हॅलेंटाईन्स स्पेशल ट्रॅकनंतर अर्जुन आणि सायली दोघांनाही आपली चूक उमगली आहे. जबाबदाऱ्यांची अदलाबदल संपवत ते पुन्हा मूळ भूमिकेत परतताना दिसणार आहेत.
tharala tar mag arjun sayali original roles

tharala tar mag arjun sayali original roles : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या एका वेगळ्याच भावनिक टप्प्यावर पोहोचली आहे. Tharala Tar Mag मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अर्जुन-सायलीचा व्हॅलेंटाईन्स स्पेशल ट्रॅक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या ट्रॅकमध्ये दोघांनीही आपल्या रोजच्या जबाबदाऱ्यांची अदलाबदल केली होती. अर्जुनने घराचा संपूर्ण कारभार हाती घेतला, तर सायलीने ऑफिसमध्ये जाऊन कामाची धुरा सांभाळली. सुरुवातीला ही कल्पना मजेशीर वाटत असली, तरी त्यातून दोघांनाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

या सगळ्याची सुरुवात अर्जुन आणि सायलीमधील एका गोड भांडणातून झाली होती. अर्जुनला वाटायचं की सायली घरात असते म्हणजे तिला फारसं काही काम नसतं, तर सायलीला असं वाटत होतं की अर्जुन सतत कामात व्यस्त राहून तिला आणि घराला वेळच देत नाही. पण जवळपास आठवडाभर एकमेकांची भूमिका निभावल्यानंतर या दोघांनाही वास्तवाची जाणीव झाली.

घर सांभाळणं म्हणजे फक्त स्वयंपाक किंवा साफसफाई नाही, तर घरातल्या प्रत्येक माणसाची काळजी, भावना आणि नातेसंबंध सांभाळणं असतं, हे अर्जुनला मनापासून पटतं. दुसरीकडे, सायलीलाही ऑफिसमधील कामाचा ताण, मीटिंग्स, सतत येणारे फोन कॉल्स आणि जबाबदाऱ्यांची जाणीव होते. त्यामुळे दोघांच्याही मनात एकमेकांविषयीचा आदर अधिकच वाढतो.

या भावनिक टप्प्यावर अर्जुन सायलीकडे माफी मागत म्हणतो की, दिवसरात्र घर आणि माणसं एकत्र बांधून ठेवण्याचं मोठं काम ती करत असते. त्यावर सायलीही आपल्या भावना व्यक्त करत सांगते की, तिला आता उमगलं आहे की “उंबरठ्याच्या आत घर नांदतं आणि उंबरठ्याबाहेर कर्तृत्व गाजतं.” अर्जुनही याला दुजोरा देत, दोन्ही बाजू सांभाळल्यावरच आयुष्याचा समतोल राखता येतो, असं सांगतो.

हे पण वाचा.. समुद्रकिनारी गुडघ्यावर बसून प्रेमाची कबुली; अपूर्वा नेमलेकर चा प्रपोजल व्हिडीओ लग्नानंतर व्हायरल

या समजुतीनंतर Tharala Tar Mag मालिकेत अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा आपल्या मूळ जबाबदाऱ्या स्वीकारणार आहेत. सायली घर सांभाळणार, तर अर्जुन ऑफिसचा कारभार पाहणार. हा खास भाग २० फेब्रुवारीला प्रसारित होणार असून, प्रोमोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हॅलेंटाईन्स स्पेशल आठवड्याचं कौतुक केलं आहे. आता पुढील भागांमध्ये अर्जुन-सायली नागराजविरोधात कोणती पावलं उचलणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. १२ दिवस सुट्टी असूनही ‘ठरलं तर मग’मध्ये रोज दिसली जुई गडकरी; कारण सांगत म्हणाली – टीममुळे सगळं शक्य झालं

tharala tar mag arjun sayali original roles