tharala tar mag 9 april 2026 episode sayali arjun : “ठरलं तर मग” या लोकप्रिय मालिकेच्या 9 एप्रिल 2026 च्या भागात प्रेक्षकांना प्रचंड धक्कादायक आणि थरारक घडामोडी पाहायला मिळाल्या. सायली आणि अर्जुनच्या अपघातात मृत्यू झाल्याची बातमी पसरताच सुभेदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. घरात सगळीकडे शोककळा पसरलेली असते, तर कल्पना अत्यंत व्याकुळ होऊन देवाला साकडं घालताना दिसते. मात्र, या सगळ्या गोंधळात प्रिया मनोमन आनंदी असते, पण बाहेरून दुःखाचा आव आणत असते.
अचानक प्रताप, अश्विन, रविराज आणि चैतन्य सायली आणि अर्जुनला घेऊन घरी परततात आणि सर्वांना मोठा दिलासा मिळतो. सायली आणि अर्जुन सुरक्षित असल्याचं पाहून घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं, पण प्रियासाठी हा मोठा धक्का असतो. तिचा संपूर्ण प्लॅन फसल्यामुळे ती संतापाने पेटून उठते.
सायली आणि अर्जुन सांगतात की हा साधा अपघात नव्हता, तर एक नियोजित घातपात होता. काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली होती. मात्र, वेळेवर सावधगिरी बाळगल्यामुळे ते दोघेही वाचले. या घटनेमागचं खरं सत्य नंतर उघड होतं, जेव्हा अर्जुन चैतन्यला सांगतो की त्यांना आधीच एका वकिलाकडून इशारा मिळाला होता.
तो वकील म्हणजेच पटवर्धन, ज्यांना प्रियाने पैशांच्या मोबदल्यात खोटं नाटक करण्यासाठी संपर्क केला होता. मात्र, त्यांनीच उलट सायली आणि अर्जुनला संपूर्ण कटाची माहिती दिली. प्रियाने महिपत आणि नागराज यांना सोडवण्याचं नाटक करत, प्रत्यक्षात सायली आणि अर्जुनचा जीव घेण्याचा कट रचला होता. यासाठी तिने सुपारी दिल्याचाही खुलासा होतो.
या माहितीच्या आधारे सायली आणि अर्जुन योग्य वेळी सतर्क राहतात आणि मोठ्या संकटातून बचावतात. दरम्यान, प्रियाचा राग अनावर होतो आणि ती थेट तुरुंगात जाऊन महिपतला जाब विचारते. तिच्या आक्रमक वागण्यामुळे महिपतही संतापतो आणि तिला गंभीर धमकी देतो.
हे पण वाचा.. कॅब कॅन्सल केल्यानंतर अभिनेत्री गायत्री दातारला ड्रायव्हरकडून त्रास, सोशल मीडियावर मदतीची हाक
दुसरीकडे, घरात सर्वजण सायली आणि अर्जुनच्या सुरक्षिततेबद्दल देवाचे आभार मानत असतात. पण या सर्व घटनांमुळे घरातील नातेसंबंधांमध्ये संशय आणि तणाव वाढताना दिसतो. सायली आणि अर्जुन मात्र ठामपणे सांगतात की हा फक्त सुरुवात आहे आणि प्रियाचा खरा चेहरा अजून समोर यायचा आहे.
हे पण वाचा.. गौरव मोरेचं स्वप्न साकार; झोपडपट्टीतून उंच इमारतीत गृहप्रवेश,छाया कदम यांची भावनिक पोस्ट चर्चेत
या भागामुळे “Tharala Tar Mag” मध्ये पुढे आणखी मोठे ट्विस्ट येणार याची चाहूल प्रेक्षकांना लागली आहे.









