Tharala Tar Mag 6 January 2026 Twist Today Episode : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag चा 6 जानेवारी 2026 चा भाग अनेक घडामोडींनी भरलेला ठरतो. सुभेदारांच्या घरात गेट-टुगेदरची तयारी सुरू असताना एकीकडे हास्य, खेळ आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं, तर दुसरीकडे संशय, पाठलाग आणि नाट्यमय वळणं कथेला वेगळी दिशा देतात.
घरात कार्यक्रमाची लगबग सुरू असते. पूर्णा आजींनी प्रियाला दिलेली शिक्षा ती पूर्ण करताना दिसते. तिचा वेष पाहून अर्जुनसह घरातील सगळ्यांनाच हसू आवरत नाही. याच दरम्यान किल्लेदार कुटुंब सुभेदारांच्या घरी पार्टीसाठी निघतं. मात्र नागराज नेहमीप्रमाणे खोटं कारण सांगत वेगळ्याच दिशेने निघतो. महिपतकडे जायचं असल्यामुळे तो मित्राच्या तब्येतीचं कारण पुढे करतो. रविराज त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नागराज काहीच ऐकत नाही.
नागराजच्या वागण्यातली अस्वस्थता सुमनच्या लक्षात येते. रविराजशी बोलताना त्याचा चेहरा पाहून सुमनला संशय येतो आणि ती मुद्दाम घरी थांबण्याचा निर्णय घेते. रविराज आणि प्रतिमा निघाल्यानंतर सुमन नागराजचा पाठलाग सुरू करते. रस्त्यावर जाताना हा मार्ग ओळखीचा वाटू लागतो. ती वारंवार सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करते, पण घरातील गोंगाटामुळे सायलीला काहीच ऐकू येत नाही.
दरम्यान, सुभेदारांच्या घरात पार्टी रंगात येते. खेळीमेळीचं वातावरण असलं तरी सायली आणि अर्जुनमधील तणाव स्पष्ट दिसतो. अर्जुन बोलण्याचा प्रयत्न करतो, पण सायली त्याला दाद देत नाही. तरीही ती सगळ्यांसाठी खेळ आयोजित करते आणि अस्मिता खुश राहील याची विशेष काळजी घेते. जोड्यांचा डान्स गेम सुरू होतो आणि त्यात अश्विनही सहभागी होतो. सायली आणि अर्जुनची वेळ आल्यावर दोघांमध्ये भांडण असूनही डान्स करताना ते एकमेकांत हरवून जातात.
यानंतर सायली फोन पाहते तेव्हा सुमनचे अनेक मिस्ड कॉल दिसतात. फोनवर बोलताना आवाज नीट ऐकू येत नसला तरी रस्त्याचा आणि रिक्षाचा आवाज ऐकून सायलीला वाटतं की सुमन घरीच येत असावी.
सगळं सुरळीत सुरू असतानाच Tharala Tar Mag मध्ये अचानक सचिनची एंट्री होते. तो साक्षीच्या पैशांतून अस्मितासाठी महागडं गिफ्ट आणतो आणि सर्वांसमोर रोमँटिक नाटक करत तिला ते देतो. त्याचा हा दिखावा सगळ्यांनाच कळतो. अस्मिता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण सचिन ऐकत नाही. शेवटी अस्मिता कंटाळून आत आराम करायला जाते.
हे पण वाचा.. २०० भागांनंतर कमळी-हृषीचा धमाकेदार रेट्रो डान्स, सोशल मीडियावर तुफान व्हायरल
दुसरीकडे, नागराज आपल्या माणसांशी बोलत असतो आणि महिपतची चौकशी करत असतानाच सुमन तिथे पोहोचते. आता तिचा संशय खरा ठरणार का, आणि पुढे कोणता मोठा खुलासा होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. Tharala Tar Mag चा हा भाग नक्कीच पुढील कथेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हे पण वाचा.. मराठी अभिनेत्री गायत्री दातारच्या घरी लग्नाची चाहूल; ‘सुपारी फुटली’ व्हिडीओ व्हायरल









