tejaswini lonari engagement trending old statement : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिचा साखरपुडा पार पडला असून, राजकीय घराण्याची सून म्हणून ती लवकरच चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. शिवसेना नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याच्याशी तेजस्विनी लग्नबंधनात अडकणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या साखरपुड्याची बातमी अचानक समोर आल्यानं चाहत्यांना अक्षरशः धक्का बसला.
तेजस्विनीच्या साखरपुड्यानंतर तिची काही महिन्यांपूर्वी दिलेली एक मुलाखत पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने केलेलं एक वक्तव्य विशेष चर्चेत आलं आहे. ती म्हणाली होती, “मला अनेक मुलांनी प्रपोज केलं, किमान ५० मुलांनी तरी. पण लग्नासाठी कोणीच विचारलं नाही.”
तेजस्विनीने ही मुलाखत ‘राजमंच’ला दिली होती. त्या वेळी तिने आपल्या आयुष्याचा प्रवास सांगताना सांगितलं होतं की ती मूळची पुण्याची असून येवला हे तिचं आजोळ आहे. वडील आर्मीमध्ये असल्याने लहानपणी विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली. शिक्षणानंतर ती पुण्यात स्थायिक झाली आणि पुढे अभिनयाच्या आवडीमुळे मुंबईकडे वळली.
अभिनेत्री म्हणाली होती, “माझ्या रूपावर बरेचजण फिदा झाले, अनेकांनी कौतुक केलं, पण कोणीही पुढे येऊन गंभीरपणे विचारलं नाही. कदाचित लोकांना वाटलं असेल की मी आधीच कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असेन.” ती पुढे म्हणाली होती की, “मी करिअरवर लक्ष केंद्रित करणारी मुलगी होते. त्यामुळे कॉलेजपासूनच प्रेमसंबंधांपासून मी दूर राहिले.”
Tejaswini Lonari ने २००६ मध्ये मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. ‘चित्तोड की रानी पद्मिनी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर ती मराठी चित्रपट आणि मालिकांमधून झळकली. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत तिचा एक चित्रपट विशेष गाजला होता.
‘बिग बॉस मराठी ४’ या शोमध्ये सहभाग घेतल्यानंतर तेजस्विनी पुन्हा चर्चेत आली होती. त्यानंतर ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतही दिसली होती, जिथं तिने प्रिया मराठेची भूमिका सांभाळली होती.
अभिनयासोबतच ती निर्मिती क्षेत्रातही उतरली असून तिने ‘तेजक्राफ्ट’ नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. त्याशिवाय तिचं एक एनजीओही कार्यरत आहे.
हे पण वाचा.. ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्विस्ट! सायलीला आलेला संशय ठरणार मालिकेचा टर्निंग पॉइंट – DNA रिपोर्टमागचं रहस्य उघड
आता तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांच्या साखरपुड्यानंतर तिचं जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. चाहत्यांनी तिच्या नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला असून, तेजस्विनीच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. तू ही रे माझा मितवा’ मध्ये अर्णववर जीवघेणा हल्ला! ईश्वरी नऊवारीत रणरागिणी अवतारात, राकेशचा घातक डाव फसला









