ADVERTISEMENT

Team India New Test Captain : कसोटी संघाच्या कर्णधारपदी मोठा बदल, गिलकडे सूत्र, BCCI कडून लवकरच अधिकृत घोषणा

शुभमन गिलकडे कसोटी संघाचं नेतृत्व रोहित-कोहलीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयकडून Team India New Test Captain म्हणून लवकरच अधिकृत घोषणा!
India New Test Captain

शुभमन गिलकडे कसोटी संघाचं नेतृत्व रोहित-कोहलीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयकडून Team India New Test Captain म्हणून लवकरच अधिकृत घोषणा!

मुंबई : भारताचा कसोटी संघ सध्या एका नव्या वळणावर पोहोचला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने टीम इंडियाच्या नेतृत्वात मोठा बदल घडणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. या पार्श्वभूमीवर नव्या कर्णधाराच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. अखेर बीसीसीआयने आपला निर्णय निश्चित केला असून, Team India New Test Captain म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे.

Team India New Test Captain BCCI कडून लवकरच अधिकृत घोषणा

पुढील महिन्यात भारताचा इंग्लंड दौरा होणार आहे. पाच कसोटी सामन्यांची ही मालिकाच नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाची पहिली कसोटी असेल. गिलसाठी हा मोठा टप्पा असून, भारतीय संघाच्या भविष्यासाठी ही निवड निर्णायक ठरू शकते. बीसीसीआयकडून 23 किंवा 24 मे रोजी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या निवडीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुंबईत होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीतच गिलच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल आणि त्याचबरोबर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची अधिकृत निवडदेखील केली जाईल. Team India New Test Captain म्हणून गिलच्या नावावर जवळपास अंतिम मोहर लागल्याचे संकेत मिळत आहेत.

शुभमन गिलसाठी ही जबाबदारी मोठी आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटचा वारसा रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांनी सांभाळला होता. आता गिलवर ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी येणार आहे. गंभीर आणि गिल ही जोडी आगामी कसोटी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघाला नव्याने घडवण्याचे काम करणार असल्याचं दिसतं आहे.

हे पण वाचा .. virat kohli ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; 14 वर्षांचा दर्जेदार प्रवास

विराट कोहली ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

दरम्यान, विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. काही माध्यमांमध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध असेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, 12 मे रोजी स्वतः विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यामुळे स्पष्ट झालं आहे की कोहली देखील इंग्लंड दौऱ्याचा भाग नसेल.

विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या मधल्या फळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्या अनुभवाची जागा भरून काढणं सहज शक्य नाही. निवड समितीसाठी ही बाब चिंता निर्माण करणारी आहे. अनुभवहीन किंवा तुलनेत कमी अनुभवी खेळाडूंवर आता जबाबदारी वाढणार आहे. केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल हे वरच्या फळीतील प्रमुख खेळाडू असतील, तर ऋषभ पंत खालच्या फळीत भूमिका बजावेल.

Team India New Test Captain म्हणून शुभमन गिलच्या नावाची निवड केवळ एका खेळाडूची निवड नसून, ही भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचं मानलं जात आहे. गिलची शैली, तरुणाईचा जोश आणि नेतृत्वगुण टीम इंडियाला पुढील काही वर्षांत नवी दिशा देऊ शकतात, अशी (BCCI) बीसीसीआयची अपेक्षा आहे.

नव्या नेतृत्वाखाली इंग्लंडसारख्या ताकदवान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणं हे गिलसाठी मोठं आव्हान असेल. या मालिकेतील कामगिरीच त्याच्या नेतृत्वगुणांची खरी कसोटी ठरणार आहे.

गिलच्या कर्णधारपदाच्या घोषणेमुळे क्रिकेटविश्वात उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सर्वांच्या नजरा आता 23-24 मे रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या अधिकृत घोषणेकडे लागून राहिल्या आहेत.

हे पण वाचा ..rohit sharma यांनी कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती,एका युगाचा झाला अंत