tatya vinchhu look by shweta mahadik halloween viral : हॅलोविन म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते हॉरर फिल्ममधील भयानक कॅरेक्टर्स आणि त्यांचे हटके कॉस्ट्यूम्स. बहुतांश कलाकार या दिवशी हॉलिवूड शैलीतील चकी, नन किंवा अॅनाबेला सारखे लूक निवडतात. मात्र मराठी टीव्ही अभिनेत्री Shweta Mahadik ने यंदा या ट्रेंडला देसी ट्विस्ट देत चाहत्यांना भन्नाट सरप्राईज दिले आहे. तिने मराठी हॉरर विश्वातील क्लासिक पात्र तात्याविंचूचा अवतार धारण करत सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
विशेष म्हणजे श्वेता महाडिक ने केवळ हा लूक साकारला नाही, तर तात्याविंचूचा कॉस्ट्यूम स्वतःच्या हाताने शिवत तयार केला आहे. तिच्या मेहनतीचा आणि क्रिएटिव्ह स्किल्सचा प्रत्यय देणारं हे काम नेटिझन्सला चकित करत आहे. श्वेताने तयार केलेल्या कॉस्ट्यूमचा व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला असून तो सध्या व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत श्वेता महाडिक तात्याविंचूचा लूक करून मुंबईतील रस्त्यांवर आणि मॉलमध्ये फिरताना दिसते. अचानक तिचा हा अवतार पाहून अनेकजण थोडे दचकल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तर काही चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करत तिच्याबरोबर फोटो आणि व्हिडिओ काढण्याची संधीही सोडली नाही.
श्वेताची क्रिएटिव्हिटी यापूर्वीपासूनच प्रेक्षकांच्या नजरेत भरत आहे. नुसते अभिनयच नव्हे तर DIY प्रोजेक्ट्स आणि रिक्रिएशनसाठी ती ओळखली जाते. टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त गोष्टी तयार करणे, जुने आउटफिट्स नव्याने डिझाइन करणे यामध्येही ती नेहमीच आघाडीवर दिसते. तिच्या या अनोख्या कल्पकतेला आणि मेहनतीला चाहते सातत्याने दाद देत असतात.
आता तिने केलेला तात्याविंचू लूकही चर्चेचा विषय ठरत असून, अनेकांनी तिचं कौतुक करत “देसी हॅलोविन क्वीन” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओने अल्पावधीतच जबरदस्त व्यूज मिळवले असून, श्वेता महाडिक ची ही क्रिएटिव्ह साइड पुन्हा एकदा समोर आली आहे.
हे पण वाचा.. क्रिकेटपटूसोबत नाव जोडलं जातयं? अभिनेत्री रिधिमा पंडितचा संताप म्हणाली – “त्याला कधी भेटलेसुद्धा नाही!”
मनोरंजन क्षेत्रात वेगळेपण जपणाऱ्या श्वेता महाडिक ने या हॅलोविनला देसी हॉरर ग्लॅमरचा नवा रंग देत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिच्या पुढच्या क्रिएटिव्ह प्रोजेक्टची उत्सुकता आता सर्वांमध्ये वाढली आहे.
हे पण वाचा.. तेजश्री प्रधानची नवीन वेब सिरीज, विन दोघातली तुटीना मालिका सोडणार का?









