tarini maliket navin action twist : झी मराठीवरील Tarini ही मालिका सध्या वेगवान कथानक, राजकीय कटकारस्थानं आणि दमदार अॅक्शनमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते आहे. या मालिकेत जितकी वैचारिक टक्कर पाहायला मिळते, तितकीच थरारक अॅक्शनही दिसते. तारिणी आणि केदार हे दोघेही एका गुप्त स्पेशल क्राईम युनिटचे सदस्य असून, विविध धोकादायक केसेस हाताळताना ते अनेकदा गुंडांचा सामना करताना दिसतात. अशा अॅक्शनने भरलेल्या भागांना प्रेक्षकांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो.
आता Tarini मालिकेत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी दाखवण्यात आलं होतं की, एमएनएन या न्यूज चॅनेलमध्ये काम करणाऱ्या कौशिकीची तब्येत बिघडल्यामुळे केदारला तिच्या जागी राजकारणी बापुराव जामखंडे यांची मुलाखत घ्यावी लागली. या मुलाखतीदरम्यान केदारने बापुराव जामखंडेंना थेट आणि बोचरे प्रश्न विचारले. या प्रश्नांमुळे जामखंडेंची खरी प्रतिमा जनतेसमोर आली आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड संतापले.
याच रागातून आता जामखंडेंचे समर्थक थेट खांडेकरांच्या घरापर्यंत पोहोचल्याचं नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे. घराबाहेर घोषणा देत हे कार्यकर्ते केदारचा जाब विचारण्यासाठी आलेले असतात. त्याच वेळी तारिणी तिथे पोहोचते आणि निर्भीडपणे सांगते की, केदारने काहीही चुकीचं केलेलं नाही, उलट त्याने “तुमच्या साहेबांचं सत्य” लोकांसमोर आणलं आहे. तिचं हे ठाम बोलणं कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं ठरतं.
यानंतर परिस्थिती आणखी चिघळते. संतप्त जमाव घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. घरातील महिलांच्या सुरक्षेसाठी तारिणी आधी त्यांना सुरक्षित ठिकाणी लपवते आणि त्यानंतर स्वतः एकटीच त्या गुंडांना सामोरी जाते. प्रोमोमध्ये तारिणी आणि गुंडांमधील थरारक मारामारी स्पष्टपणे पाहायला मिळते. या दृश्यांतून तारिणीचा धाडसी आणि रणरागिणी अवतार प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतो.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने “केदारसाठी तारिणी प्रत्येक संकटाला भिडणार” अशी कॅप्शन दिली असून, सोशल मीडियावर चाहत्यांकडून तारिणीच्या या रूपाचं जोरदार कौतुक होत आहे. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राईम युनिटचे सदस्य असल्याची गोष्ट अजूनही सर्वांपासून गुप्त आहे. एकीकडे सामान्य आयुष्य जगताना, दुसरीकडे देशासाठी धोकादायक मिशन्स पार पाडणं, हा दुहेरी संघर्ष आता कथानकाला आणखी रोचक बनवत आहे.
हे पण वाचा.. लग्नानंतर उमलणारं खरं प्रेम! पार्थने काव्याला दिलं आयुष्यभराचं वचन; प्रोमोने जिंकलं प्रेक्षकांचं मन
आता केदार एमएनएन न्यूज चॅनेलमध्ये काम करत असल्याने पुढील भागांमध्ये आणखी कोणते राजकीय आणि गुन्हेगारी वळण येणार, तसेच तारिणी केदारला वाचवण्यात कितपत यशस्वी ठरणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. देवमाणूस मध्ये नवी एंट्री, अजितकुमारचा खेळ उलटणार? Devmanus New Entry







