tarini kedar father truth twist update : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Tarini सध्या प्रेक्षकांना रोमांचक व भावनिक वळणांमधून नेते आहे. या मालिकेतील एक महत्त्वाचा पात्र असलेल्या केदारच्या जीवनात आता मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. आईच्या निधनानंतर केदार आपल्या वडिलांचा शोध घेत होता, पण त्याच्याकडे असलेल्या एका जुन्या फोटोमध्ये फक्त अंगठी दिसत होती. त्याच धाग्याला पकडून तो सतत वडिलांच्या ओळखीचा मागोवा घेत होता.
या शोधादरम्यान त्याची ओळख युवराजचे वडील दयानंद खांडेकर यांच्याशी झाली. दोघांमध्ये हळूहळू चांगली मैत्रीही झाली. दोघेही एकमेकांशी अनेक गोष्टी शेअर करत होते. पण दयानंदलाच एका क्षणी जाणवतं की तोच केदारचा वडील असू शकतो. हा धक्का दयानंदलाइतका केदारसाठीही मोठाच आहे.
प्रोमोमध्ये दाखवलेली पुढची घटना तर मालिकेची दिशा बदलून टाकणारी आहे. तारिणी आणि तिच्या टीमवर एक गुंड हल्ला करतो. त्याच्या बंदुकीच्या निशाण्यावर कमांडर असताना टीमला वाचवण्याची जबाबदारी केदारवर असते. परंतु, त्याच्या मनात सतत दयानंदच आपले वडील असल्याची जाणीव घोळत असते. त्याचा परिणाम म्हणून तो क्षणभर स्तब्ध होतो आणि कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही.
ही चूक तारिणीच्या नजरेतून सुटत नाही. ती केदारला फैलावर घेते—“कमांडरचा जीव धोक्यात होता, आणि तू विचलित झालास का?” या प्रश्नाने केदारचं मन अधिकच ढवळून निघतं. अखेर तो तिला सत्य सांगतो—दयानंद खांडेकरच त्याचे वडील आहेत. संताप, धक्का आणि भावनिक ताण या साऱ्या भावनांचा उद्रेक त्याच्याकडून होतो. एका क्षणी तो झाडाला रागाने मारतो, तर पुढच्याच क्षणी तारिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागतो.
झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडेच—वडिलांचं सत्य केदारचं आयुष्य कोणत्या दिशेने नेईल? तारिणी त्याला कशी साथ देणार? दयानंद आणि केदारमध्ये नातं स्वीकारण्याची तयारी होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तारिणी युवराज आणि गुलाबबद्दलचं लपलेलं सत्य कधी उघड करणार?
हे पण वाचा.. रुद्रप्रताप–गिरीजाच्या आयुष्यात नवं वादळ! नशिबवान मालिकेत नवीन पात्राची एन्ट्री
Tarini मालिकेतील पुढील भाग या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देताना प्रेक्षकांना आणखी एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाणार हे निश्चित.
हे पण वाचा.. वल्लरी विराजची नवी मालिका येतेय! झी मराठीवर तिच्यासोबत कोणता हिरो दिसणार?









