१ जानेवारीला प्रदर्शित होणार हेमंत ढोमेचा ‘क्रांतिज्योती विद्यालय’; प्राजक्ता कोळीचं मराठीत पदार्पण KrantiJyoti Vidyalay
KrantiJyoti Vidyalay Movie ‘झिम्मा’ आणि ‘फसक्लास दाभाडे’ सारख्या हिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला नव्या चित्रपटासह येत आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या सिनेमाद्वारे मराठी शाळांचा अभिमान आणि मातृभाषेचं महत्त्व नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ‘मोस्टली सेन’ म्हणून ओळखली जाणारी प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकणार आहे.