१५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अभिनेता कपिल होनरावचं स्वप्न साकार; मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणाला – “आजही विश्वास बसत नाही”
kapil honrao new home in mumbai marathi news : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा कपिल होनराव (Kapil Honrao)अखेर मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेऊन भावुक झाला आहे. १५ वर्षांच्या भाड्याच्या घरातील आयुष्याला पूर्णविराम देत त्याने आपल्या नव्या घरातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले.