Swapnil Joshi ची स्पष्ट भूमिका : “हिंदी शिकणं व्यक्तिस्वातंत्र्य, सक्ती नकोच!”

Swapnil Joshi

मराठी विरुद्ध हिंदी या वादावर अभिनेता Swapnil Joshi याने ठाम भूमिका मांडली आहे. “ज्यांना हिंदी शिकायची आहे त्यांनी शिकावी, पण हिंदी शिकणं कोणावरही लादू नये,” असं त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे.

स्वप्नील जोशीचा हिंदी- मराठी भाषावादावर ठाम पवित्रा; म्हणतो, “हिंदी शिकणं सक्तीचं नाही”

सध्या राज्यात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा. मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सध्या अनेक मंचांवर चर्चेचा विषय ठरतो आहे. शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय सक्तीचा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय जाहीर होताच विरोधकांसह मराठी कलाकारांमधून याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता Swapnil Joshi यानेही आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे.

Swapnil Joshi हा नेहमीच आपल्या प्रामाणिक मतासाठी ओळखला जातो. या वादावर बोलताना त्याने म्हटलं, “मी फक्त अभिनेता म्हणून नाही, तर एक मराठी माणूस म्हणून सांगतोय. मी महाराष्ट्रात राहतो आणि माझं स्पष्ट मत आहे की हिंदी शिकणं सक्तीचं असू नये. ज्यांना हिंदी शिकायचं आहे त्यांनी नक्की शिकावं, पण हिंदी शिकलीच पाहिजे या मताशी मी सहमत नाही.”

Swapnil Joshi सध्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र‘ उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. या उपक्रमात लाखो झाडांची लागवड करण्यात आली. याच कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना स्वप्नीलने हा विषय उचलून धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम‘ या उपक्रमातून प्रेरणा घेत हा हरित उपक्रम राबवला जात आहे. अशा सकारात्मक उपक्रमांसोबत भाषेचा वाद निर्माण करणं योग्य नाही, असंही स्वप्नीलने अप्रत्यक्षपणे सूचित केलं.

हे पण वाचा..Ye Re Ye Re Paisa 3′ पाहून प्रवीण तरडेंचा उत्स्फूर्त प्रतिसाद, म्हणाले – मराठीतही व्यावसायिक सिनेमा शक्य!

राज्यात अनेक कलाकारांनी सुरुवातीपासूनच हिंदी विषय सक्तीविरोधात आवाज उठवला आहे. सोशल मीडियावरूनही अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. स्वप्नीलनेही यासंदर्भात थेट भूमिका घेत सांगितलं की शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, आणि कोणतीही भाषा शिकणं ही त्याची निवड असली पाहिजे, सक्ती नाही.

राजकीय क्षेत्रातही या मुद्द्यावरून खूप गदारोळ झाला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी अनेक संघटना, संस्था आणि कलाकारांनी सरकारवर टीका केली. अखेर या वाढत्या विरोधामुळे सरकारला मागे हटावं लागलं आणि जुलै महिन्यातच या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले.

Swapnil Joshi ने दिलेली प्रतिक्रिया अनेकांना भावणारी आहे. कारण त्याने भाषेच्या विषयावर फक्त भावनिक दृष्टिकोन न ठेवता, व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा स्पष्टपणे मांडला आहे. त्याच्या मते, मराठी माणसाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे, पण त्याचवेळी कोणतीही भाषा शिकणं हे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. कोणावरही ते लादू नये.

सध्या सोशल मीडियावर Swapnil Joshi च्या  वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी या मुद्द्यावर त्याचं समर्थन केलं आहे. कलाकार म्हणून नाही तर संवेदनशील नागरिक म्हणून Swapnil Joshi पुन्हा एकदा लोकांच्या मनात घर करताना दिसतो आहे.

हे पण वाचा ..Jitendra Joshi :”मुलीचा बाप होणं वेगळंच सुख…” लेकीसाठी शेअर केली भावनिक पोस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *