11 चेंडूंमध्ये विक्रम करणारा Suryakumar Yadav जयपूरच्या मैदानावर ‘सूर्या स्टाईल’ मध्ये नवा इतिहास रचला.
Table of Contents
IPL 2025 च्या रंगतदार हंगामात मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज Suryakumar Yadav पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. जयपूरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना सूर्यानं अशी काही खेळी साकारली, जी आजवर कोणत्याही फलंदाजाला जमली नव्हती. केवळ 11 चेंडूंमध्ये त्यानं 10 वर्ष जुना विक्रम मोडीत काढत इतिहास रचला.
Suryakumar Yadav चा तुफानी कारनामा
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील हा स्टार फलंदाज सध्या आपल्या उत्तुंग फॉर्ममध्ये खेळतो आहे. IPL 2025 च्या 50व्या सामन्यात जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना करताना Suryakumar Yadav ने एका नव्या विक्रमाची नोंद केली. तो IPL इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने सलग 11 डावांत 25 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या आधी हा विक्रम रॉबिन उथप्पाच्या नावावर होता. उथप्पानं 2014 साली कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना सलग 10 वेळा 25+ धावा केल्या होत्या.
जयपूरच्या सामन्यात Suryakumar Yadav नं केवळ 11 चेंडूंमध्येच 25 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर त्याने 23 चेंडूंमध्ये नाबाद 48 धावा करत राजस्थानच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. या डावात त्याचं ‘सूर्या स्टाईल’ अटॅकिंग क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळालं. त्याचा यंदाच्या हंगामातील सर्वात कमी स्कोअरही 26 धावांचा आहे, जो त्याने 17 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केला होता. याशिवाय Suryakumar Yadav याआधी तीन अर्धशतकं झळकावून बसला असून, IPL 2025 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 171.15 आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. रायन रिकेलटन आणि रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकांनी मुंबईला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. रिकेलटननं 61 आणि रोहितनं 53 धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये Suryakumar Yadav आणि कर्णधार हार्दिक पंड्यानं तुफानी फटकेबाजी करत प्रत्येकी 23 चेंडूंमध्ये नाबाद 48 धावा फटकावत संघाला 217/2 चा भक्कम स्कोर उभारून दिला. सुरुवातीची सलामी आणि अखेरच्या क्षणांची हल्लाबोल खेळी ही मुंबईच्या डावाची खासियत ठरली.
राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जायसवाल आणि रियान पराग जोडीने डावाची सुरुवात केली. संघात वैभव सूर्यवंशी, नीतीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर यांचाही समावेश होता. गोलंदाजीसाठी जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल आणि फजलहक फारुकी यांना संधी देण्यात आली. इम्पॅक्ट प्लेअर्स म्हणून राज बावा, सत्यनारायण राजू, रॉबिन मिंज, रीस टॉपले आणि कर्ण शर्मा सज्ज होते.
मुंबई इंडियन्सच्या संघात कर्णधार हार्दिक पंड्या, रायन रिकेलटन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश होता. इम्पॅक्ट प्लेअर्समध्ये शुभम दुबे, तुषार देशपांडे, कुणाल सिंह राठौड, युद्धवीर सिंह चरक आणि क्वेना मफाका तयार होते.
सामन्यातील या ऐतिहासिक खेळीमुळे Suryakumar Yadav पुन्हा एकदा IPL मधील सर्वाधिक विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्याचा सततचा फॉर्म आणि नव्या विक्रमांनी आगामी सामन्यांमध्येही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत.
हे पण वाचा…देशाची दुसरी सर्वात श्रीमंत क्रिकेटर smriti mandhana: मैदानावर दमदार तर स्टाईलमध्येही सुपरहिट!