ADVERTISEMENT

आमचं Love Marriage! लग्नानंतर सूरज चव्हाणची पहिली खास पोस्ट; बायकोला घेऊन गेला जेजुरीला

Suraj Chavan Wedding : ‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 विजेता सूरज चव्हाण आणि संजना यांच्या लव्ह मॅरेजनंतरची त्याची पहिली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. देवदर्शनानं सुरुवात करत दोघांनी शेअर केलेले खास फोटो आता चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
suraj chavan wedding

Suraj Chavan Wedding : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात विजेतेपद पटकावून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा सूरज चव्हाण आता वैवाहिक जीवनात दाखल झाला असून, त्याच्या लग्नानंतरची पहिली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. Suraj Chavan Wedding ची उत्सुकता आधीपासूनच प्रचंड होती आणि २९ नोव्हेंबरला पार पडलेला त्याचा विवाहसोहळा तितकाच थाटामाटात झाला. संजना हिच्यासोबत सूरजनं लव्ह मॅरेज केलं असून, संजना ही त्याच्या चुलतमामांची मुलगी आहे. या नात्यातील आपुलकी आणि प्रेमाचं नातं अखेर विवाहबंधनात रुपांतरित झालं.

लग्नाच्या दिवशी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार, लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि अनेक प्रतिष्ठित राजकीय मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. चाहत्यांनी तर सूरजच्या लग्नाला अक्षरशः गर्दी करत या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.

suraj chavan wedding लग्नानंतर काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहिलेला सूरज अखेर इंस्टाग्रामवर परतला आणि त्यानं संजना सोबतचा एक सुंदर प्री-वे‍डिंग फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या. “जी होती मनात तिच बायको केली… आमचं लव्ह मॅरेज यशस्वी झालं,” असं कॅप्शन देत त्यानं आपल्या चाहत्यांसमोर दोघांच्या नात्याचं गोड रहस्य उघडलं. ही पोस्ट शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला.

हे पण वाचा.. पूजा बिरारी सोहम बांदेकरची हळद, हळदीला पूजाचा धमाल डान्स Pooja Birari Soham Bandhekar Halad

लग्नानंतर सूरज आणि संजना यांनी पहिल्यांदा जेजुरीला जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलं. गडावरून घेतलेल्या या खास भेटीचे फोटोही सूरजनं आपल्या चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिले. “मल्हारी माझा जगाचा राजा, आलोय जोडीनं दर्शनाला,” या कॅप्शनसह दोघांच्या या भाविक भेटीची झलक त्यानं दाखवली.

सूरज–संजना यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा ओघ सुरूच असून, “शून्यातून विश्व उभारलं”, “महाराष्ट्राची बेस्ट जोडी”, “दोघांवर नजर नको” अशा कमेंट्सने चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

हे पण वाचा.. ३६ गुणी जोडी’तील ऑनस्क्रीन भावाबहीण खऱ्या आयुष्यात झाले जीवनसाथी; अक्षता आपटे आणि स्वानंद केतकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल

Suraj Chavan Wedding