ADVERTISEMENT

सूरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकर चा संताप; चाहत्यांच्या गर्दीमुळे थांबला विधी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

suraj chavan wedding janhavi killekar viral video : महाराष्ट्राचा ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाणच्या लग्नात चाहत्यांची प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला आणि जान्हवी किल्लेकर ला राग आवरला नाही. तिने माईक हातात घेत सर्वांना शांततेची विनंती केली आणि हा क्षण व्हायरल झाला आहे.
suraj chavan wedding janhavi killekar viral video

suraj chavan wedding janhavi killekar viral video : महाराष्ट्रभर ओळखला जाणारा सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध झाला आणि त्याच्या या सोहळ्यात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. सासरवड येथे रंगलेल्या या लग्नाला मराठी मनोरंजन क्षेत्रातील नामांकित कलाकारांसोबत अनेक इन्फ्लुएन्सर आणि राजकीय मान्यवरांनीही हजेरी लावली. मात्र, या मोठ्या गर्दीचा परिणाम असा झाला की काही क्षण लग्नाची संपूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली. याच वेळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) चा धीर सुटला आणि तिने थेट उपस्थितांना संयम पाळण्याची विनंती केली.

लग्नाच्या मंडपाजवळ चाहत्यांची एवढी झुंबड उडाली की सूरजला वरमहालात वेळेवर पोहोचता येईना. फोटो काढण्याची चाहूल लागताच अनेक जण थेट मंडपाभोवती जमले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहताच जान्हवी किल्लेकर पुढे आली आणि माईक हातात घेत सर्वांना आवाहन केलं. ती म्हणाली, “आपण लग्नाच्या शुभ प्रसंगासाठी आलो आहोत. कृपया थोडा संयम ठेवा. सूरज आत बसून वैतागत आहे. थोडी शिस्त पाळली नाही तर विधी उशिरा होतील.”

तिच्या आवाजात संताप आणि विनंती दोन्ही जाणवत होते. “मी हात जोडून विनंती करते, प्लीज थोडं बाजूला व्हा,” असे म्हणत जान्हवी किल्लेकरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा संपूर्ण प्रसंग तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला आणि काही क्षणांतच सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जान्हवी किल्लेकरचे कौतुक केले. बहिणीच्या नात्याने लग्नातील प्रत्येक क्षणात तिची धावपळ दिसत होती, असे अनेकांनी म्हटलं. तसेच, एवढ्या मोठ्या गर्दीत तिचा राग येणं स्वाभाविक असल्याचेही काहींनी नमूद केले.

लग्नाच्या आधीपासूनच Jahnavi Killekar मोढवे गावात उपस्थित होती. मेहंदी आणि हळदीत तिने मनापासून सहभाग घेतला होता, तिचे डान्स व्हिडीओ देखील चर्चेत आहेत. सूरजच्या वरातीतही तिने उत्साहाने रंग भरला. मात्र, लग्नविधी अडवला जात असल्याचं पाहून तिच्या सहनशीलतेचा बांध सुटला.

दरम्यान, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील यांसारखे ‘बिग बॉस मराठी ५’चे स्पर्धकही लग्नाला उपस्थित होते, तर अंकिता वालावलकर काही कारणास्तव हजर राहू शकली नाही.

हे पण वाचा.. Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाण लग्नबंधनात! सासवडमध्ये थाटात पार पडला विवाहसोहळा

सूरज चव्हाणच्या या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर कमालीची चर्चा आहे आणि त्यात जान्हवी किल्लेकरच्या या व्हायरल क्षणाने तर आणखी रंग भरला आहे.

हे पण वाचा.. मानसी नाईकच्या एक्स पती प्रदीप खरेराने केला दुसरा विवाह; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

suraj chavan wedding janhavi killekar viral video