ADVERTISEMENT

साऊथमध्ये झळकण्याचं स्वप्न! सूरज चव्हाणला अल्लू अर्जुन सोबत कामाची इच्छा

suraj chavan wants to work with allu arjun in south cinema : सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण याने साऊथ इंडस्ट्रीत जाण्याची इच्छा व्यक्त करत थेट अल्लू अर्जुन सोबत काम करण्याचं स्वप्न सांगितलं. त्याच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
suraj chavan wants to work with allu arjun in south cinema

suraj chavan wants to work with allu arjun in south cinema : सोशल मीडियावर आपल्या हटके स्टाईलमुळे ओळख निर्माण करणारा सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉस मराठीच्या विजयानंतर त्याच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली आणि त्यानंतर तो सतत नव्या संधींच्या शोधात असल्याचं दिसत आहे. आता सूरज चव्हाण ने थेट साऊथ फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा व्यक्त करत मोठं स्वप्न उघड केलं आहे.

अलीकडेच एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सूरज चव्हाण मनमोकळेपणाने बोलला. या संवादात त्याने आपल्या करिअरबद्दल, आवडीनिवडींबद्दल आणि भविष्यातील योजना स्पष्ट केल्या. विशेष म्हणजे त्याने साऊथ इंडस्ट्रीत जाण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. “मला एकदा तरी साऊथमध्ये काम करायचंय,” असं तो ठामपणे म्हणाला.

त्याने पुढे सांगितलं की, साऊथ सिनेमांची शैली, अ‍ॅक्शन आणि सादरीकरण त्याला खूप आवडतं. विशेषतः Allu Arjunचा तो मोठा चाहता असल्याचं त्याने कबूल केलं. “त्याचे सिनेमे वेगळे असतात आणि तो जे काही करतो ते लोकांना आवडतं. मला त्याच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे,” असं सूरज चव्हाण म्हणाला.

सूरज चव्हाण च्या बोलण्यातून त्याचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता. “मी एकदा साऊथमध्ये गेलो की टॉपचं कामच करणार,” असं तो ठामपणे म्हणाला. त्याला अ‍ॅक्शन सीनची विशेष आवड असल्याचंही त्याने नमूद केलं. “लोक मला जंगली म्हणतात, पण मी जे करतो ते पूर्ण ताकदीने करतो,” असं त्याने हसत सांगितलं.

हे पण वाचा..सई कल्याणकर आई झाली! ‘कमळी’ फेम अभिनेत्रीच्या घरी गोजिरी परीचं आगमन

suraj chavan wants to work with allu arjun in south cinema

याच मुलाखतीत सूरज चव्हाण ने सयाजी शिंदे यांच्याबद्दलही उल्लेख केला. “त्यांच्याशी ओळख झाली की माझा साऊथचा मार्ग मोकळा होईल,” असं तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्यामुळे तो साऊथ इंडस्ट्रीत प्रवेशासाठी गंभीर असल्याचं स्पष्ट होतं.

हे पण वाचा.. पाय फ्रॅक्चर असूनही शिवानी रांगोळेने नाटक थांबवलं नाही, जखमी अवस्थेतच केला प्रयोग

सध्या सूरज चव्हाण मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असला तरी त्याची नजर आता मोठ्या पडद्यावर आणि व्यापक प्रेक्षकवर्गावर आहे. त्याचा आत्मविश्वास आणि वेगळा अंदाज पाहता, येत्या काळात तो साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.