suraj chavan new home balcony special story : ‘बिग बॉस मराठी’चा विजेता आणि लाखोंच्या मनातील आवडता कलाकार सूरज चव्हाण (Suraj Chavan) गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याने नुकतंच आपल्या नव्या घराचं दर्शन चाहत्यांना घडवलं. अनेक महिन्यांचं कष्ट, नियोजन आणि स्वप्न पूर्ण करत त्याने या आलिशान बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. शोमध्ये असताना स्वतःचं घर असावं याची इच्छा व्यक्त करणारा सूरज चव्हाण आज त्या घरात उभा आहे, हे पाहून त्याच्या चाहत्यांनाही आनंद झाला.
त्याच्या घराचा विशेष व्हिडीओ ‘अभिजात मराठी ओटीटी’ या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला असून यात सूरज चव्हाण ने त्याच्या घरातील प्रत्येक कोपरा प्रेमाने दाखवला. हॉल दाखवत तो म्हणतो की, इथे त्याची ‘बिग बॉस’ ट्रॉफी ठेवली जाणार आहे जेणेकरून घरात येणाऱ्या प्रत्येक चाहत्याला ती दिसेल.
मात्र या घरात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी जागा म्हणजे पहिल्या मजल्यावरील बाल्कनी. ही जागा सूरज चव्हाण ने खास त्याच्या चाहत्यांसाठी तयार केली आहे. बाल्कनीत उभं राहून तो चाहत्यांना भेटणार, त्यांच्याशी संवाद साधणार, आणि त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देणार आहे. ही जागा त्याच्यासाठी फक्त बाल्कनी नाही तर चाहत्यांशी जोडणारा ‘ब्रिज’ आहे असं तो म्हणतो.
या बाल्कनीतून दिसणाऱ्या दृश्याबद्दल बोलताना तो भावूक झाला. सूरज चव्हाण सांगतो, “इथून आई मरी मातेचं शिखर स्पष्ट दिसतं. रोज सकाळी हे दृश्य पाहिलं की मन शांत होतं. माझ्या यशात आई मरी मातेची आणि माझ्या सर्व देवांची कृपा आहे. या जागेतून मी माझ्या चाहत्यांना हात हलवून नमस्कार करणार, त्यांचं प्रेम मला नेहमीच ऊर्जा देतं.”
सध्या या घरासोबतच सूरज चव्हाण च्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा रंगली आहे. येत्या २९ नोव्हेंबरला तो संजना सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. संजना ही त्याच्या नात्यातील मुलगी असून त्यांचं प्रेम विवाहात रूपांतरित होत आहे.
हे पण वाचा.. मालेगाव प्रकरणावर अभिनेत्री रुचिरा जाधव चा संताप; म्हणाली..
आलिशान घर, चाहत्यांसाठी ठेवलेली खास जागा आणि आयुष्यातील नवीन पर्व—सूरज चव्हाण सध्या आयुष्यातील सर्वात आनंदी टप्पा अनुभवत आहे.
हे पण वाचा.. बिग बॉस १९ प्रणित मोरेच विजेता! आरती सिंगचा ठाम पाठिंबा मराठमोळ्या कॉमेडियनचा गेम जबरदस्त!









