ADVERTISEMENT

Suraj Chavan च्या आलिशान बंगल्याचं नाव ठरलं भावनिक; नेमप्लेटचा पहिला फोटो आला समोर

suraj chavan new bungalow nameplate house name : सूरज चव्हाण यांनी नव्या आयुष्याची सुरुवात करत आपल्या आलिशान बंगल्याला आई-वडिलांच्या आठवणींना समर्पित खास नाव दिलं असून घराबाहेरील नेमप्लेट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
suraj chavan new bungalow nameplate house name

suraj chavan new bungalow nameplate house name : गेली काही दिवस Suraj Chavan हा नाव केवळ सोशल मीडियावरच नाही तर मराठी मनोरंजन विश्वातही सातत्याने चर्चेत आहे. नुकताच २९ नोव्हेंबर रोजी पार पडलेला त्याचा थाटामाटातील विवाहसोहळा आणि त्यानंतरचं नवविवाहित आयुष्य यामुळे चाहत्यांचं लक्ष त्याच्याकडे खिळून आहे. सूरज चव्हाण आणि संजना यांच्या लग्नाला कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. लग्नानंतर आता हे दोघंही नव्या घरात सुखाचा संसार सुरू करत आहेत.

लग्नाइतकंच लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे Suraj Chavan च्या नव्या आलिशान बंगल्याचं नाव. ‘बिग बॉस मराठी ५’ नंतर सूरजच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अजित पवार यांनी सूरजसाठी घर बांधून देण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या वर्षभरात त्याचं स्वप्न साकार झालं. भव्य, आकर्षक इंटिरियर आणि शांत परिसरात उभा राहिलेला हा बंगला पाहून अनेकजण भारावून गेले आहेत.

मात्र या बंगल्याची खरी ओळख ठरते ती त्याच्या बाहेर लावलेल्या नेमप्लेटमुळे. Suraj Chavan ने आपल्या आयुष्यातील संघर्ष, यश आणि संस्कार यांचा पाया असलेल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत घराला ‘आई-आप्पांची पुण्याई’ असं भावनिक नाव दिलं आहे. बंगल्याबाहेर लावलेल्या नेमप्लेटवर “आई-आप्पांची पुण्याई… सूरज चव्हाण व सौ. संजना चव्हाण” असे शब्द कोरलेले आहेत. या नेमप्लेटचा पहिला फोटो समोर येताच तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

सूरज नेहमीच आपल्या आई-वडिलांबद्दल कृतज्ञतेनं बोलताना दिसतो. घरची परिस्थिती अत्यंत साधी असताना, मेहनत, सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि ‘बिग बॉस’सारख्या मंचामुळे आज तो या टप्प्यावर पोहोचला आहे. “आज हे सगळं पाहायला आई-बाबा हवे होते,” ही भावना तो अनेकदा व्यक्त करतो. त्यामुळेच या बंगल्याचं नावही त्यांच्या आठवणींना अर्पण करणं, हे सूरजच्या स्वभावाचं प्रतीक मानलं जात आहे.

विशेष म्हणजे, या नव्या घराच्या बाल्कनीतून आई मरी मातेचं शिखर दिसत असल्याचं सूरजने स्वतः एका व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे या घराला त्याच्यासाठी केवळ आलिशान वास्तू नाही, तर श्रद्धा आणि भावनांचं केंद्रही आहे.

हे पण वाचा..

दरम्यान, Suraj Chavan आता ‘गोफणे’ परिवाराचा जावई झाला असून, लग्नानंतर तो आणि संजना जोडीने जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी गेले होते. वैयक्तिक आयुष्य, यश आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ दाखवणारा सूरजचा हा प्रवास चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे पण वाचा..

suraj chavan new bungalow nameplate house name