suraj chavan dream home first look ankita valwalkar video : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता ठरलेला Suraj Chavan पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या नव्या घराची पहिली झलक समोर आली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नुकतीच त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अंकिता वालावलकर त्याला भेटायला गावी गेली होती. लग्नसोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्यामुळे तिनं आधीच सूरजला भेट दिली आणि त्याच वेळी सूरजच्या नवीन घरातही डोकावलं.
सूरज चव्हाणच्या या घरामागे एक वेगळी कहाणी आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये विजय मिळवल्यानंतर त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर भूमिपूजन सोहळा झाला आणि स्वतः अजित पवार यांनी बांधकामाच्या प्रगतीची पाहणी केली होती. आता ते घर पूर्णत्वाकडे जात असून सूरज लवकरच या बंगल्यात आपल्या पत्नीचं स्वागत करणार आहे.
अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओत सूरजने स्वतः तिला संपूर्ण घर दाखवलं. अजून काही बांधकामाचं काम बाकी असलं तरी बंगल्याची भव्यता पाहून चाहते भारावले आहेत. या घरातल्या पायऱ्यांचं आणि आतील सजावटीचं काम सुरू असून, लवकरच गृहप्रवेश होणार असल्याची माहिती सूरजने दिली आहे.
हे पण वाचा.. लग्नबंधनात अडकणार बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण; अंकिता वालावलकरने दिली खुशखबर
काही दिवसांपूर्वी घराविषयी बोलताना Suraj Chavan म्हणाला होता, “घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद आहे. गरीबाच्या मुलाला घर देऊन दादांनी (अजित पवार) मोठं उपकार केलं. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्यच झालं नसतं.” त्याचं आयुष्य खरंतर संघर्षमय होतं. लहानपणी आई-वडिलांचं छत्र हरपल्यावर बहिणींनी त्याचा सांभाळ केला. मात्र सोशल मीडिया रील्समुळे त्याला लोकप्रियता मिळाली आणि ‘बिग बॉस’मुळे त्याचं आयुष्यच बदललं.
सूरजने आधीच स्पष्ट केलं आहे की आपल्या या नव्या घराला तो ‘Bigg Boss’ असं नाव देणार आहे. कारण हाच शो त्याच्या आयुष्याला खरं वळण देणारा ठरला. आता चाहत्यांच्या नजरा त्याच्या लग्नसोहळ्यावर आणि या भव्य बंगल्यात होणाऱ्या गृहप्रवेश सोहळ्यावर खिळल्या आहेत.
हे पण वाचा.. “‘देवमाणूस’ फेम अस्मिता देशमुखची फसवणूक; अभिनेत्रीची चाहत्यांना सतर्क रहाण्याची कळकळीची विनंती









