sunil barve paru maliketun exit : मराठी मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) सध्या ‘पारू’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मालिकेत ते सयाजी या व्यक्तिरेखेत दिसत असून, ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून गेली आहे. मात्र, अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे मालिकेतून त्यांच्या एक्झिटच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सुनील बर्वे यांनी नुकतेच मालिकेतील सहकलाकारांसोबतचे काही फोटो पोस्ट केले. या छायाचित्रांसोबत त्यांनी लिहिलं की, “या सगळ्या सुंदर कलाकारांसोबत मी पहिल्यांदाच काम केलं. मला खूप आनंद मिळाला. त्यांचं मला माहीत नाही…” अशा प्रकारची ओळ वाचून चाहत्यांनी लगेचच अंदाज बांधला की, कदाचित ते या मालिकेला अलविदा म्हणणार आहेत का?
या पोस्टखाली कलाकारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मालिकेत अहिल्याची भूमिका साकारणारी मुग्धा कर्णिक म्हणाली, “खूप वर्षांपासूनची माझी इच्छा पूर्ण झाली.” तर दामिनीच्या भूमिकेत झळकणारी श्रुतकीर्ती सावंतने त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा असल्याचं नमूद केलं. अभिनेत्री अमृता देशमुखनेदेखील त्यांचे कौतुक करत लिहिलं की, “यशस्वी असतानाही साधेपणा जपणं ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही त्याचं उत्तम उदाहरण आहात.”
प्रेक्षकांमध्येही या पोस्टनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सयाजी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भावनांशी जोडलेली असल्याने, जर खरोखरच सुनील बर्वे मालिकेतून बाहेर पडले तर तो मालिकेसाठी मोठा धक्का ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.
हे पण वाचा.. मिस इंदौर झाली मिसेस अर्णव! अभिजीत आमकरनं शेअर केले लग्नाचे खास क्षण
‘पारू’ मालिकेत सयाजीचे पात्र केवळ प्रियाचे वडील म्हणूनच नाही तर पारूलाही आपल्या मुलीसारखं मानणाऱ्या संवेदनशील बापाचं दर्शन घडवतं. आदित्य आणि पारूच्या नात्यात त्यांची साथ, तसेच अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद ही व्यक्तिरेखेची खास वैशिष्ट्यं ठरली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या भूमिकेचं स्थान वेगळंच आहे.
सध्या मालिकेत पुढील घडामोडी कोणत्या वळणावर जातील आणि सुनील बर्वे खरंच मालिकेतून एक्झिट घेणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. पारू साठी आदित्य सोडणार किर्लोस्करांचं घर, प्रोमो पाहून प्रेक्षकांना धक्का!” Paaru Serial New Twist









