मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. आंदोलकांच्या उपस्थितीमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिला भर दुपारी मुंबईच्या रस्त्यावर भीषण अनुभवाचा सामना करावा लागला. तिने आपला हा प्रसंग सोशल मीडियावर शेअर करताना पोलिस यंत्रणेवर कठोर टीकाही केली आहे.
Sumona Chakravarti ने इन्स्टाग्रामवर एक विस्तृत पोस्ट लिहिताना सांगितलं की, दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ती कुलाबाहून फोर्टकडे जात असताना अचानक आंदोलकांच्या मोठ्या गर्दीने तिच्या कारला अडवले. भगवा गमछा घातलेल्या एका व्यक्तीने कारच्या बोनेटवर हात आपटत विचित्र हालचाली केल्या. इतकंच नव्हे तर तो हसत-खिदळत तिच्या गाडीच्या अगदी समोर उभा राहिला. त्याच्यासोबत इतर काही जण कारच्या आरश्याजवळ येऊन “जय महाराष्ट्र” अशा आरोळ्या देत होते.
फक्त एकदाच नाही, तर पाच मिनिटांच्या आत दोनदा तिच्यासमोर अशा प्रकारचा प्रसंग घडल्याचं सुमोनाने सांगितलं. “भर दुपारी साऊथ मुंबईसारख्या भागात मला स्वतःच्या गाडीतही असुरक्षित वाटलं. आश्चर्य म्हणजे तिथे एकही पोलिस दिसला नाही. नंतर काही पोलीस जवळ बसलेले होते, पण ते फक्त गप्पा मारत होते. कायदा आणि सुव्यवस्था या शहरात अस्तित्वातच नाहीत का, असा प्रश्न पडतो,” असं ती म्हणाली.
याचबरोबर Sumona Chakravarti ने रस्त्यांवरील अस्वच्छतेकडेही लक्ष वेधलं. “फुटपाथवर कचरा, केळ्याची सालं, प्लास्टिक बॉटल्स टाकून दिल्या होत्या. आंदोलक आंदोलनाच्या नावाखाली रस्त्यावर बसून जेवत होते, अंघोळ करत होते, व्हिडीओ कॉल्स, रील्स शूट करत होते. नागरी सुव्यवस्थेची खिल्ली उडवली जात होती,” असं ती म्हणाली.
हे पण वाचा.. ‘पवित्र रिश्ता’ अभिनेत्री Priya Marathe च्या आठवणीत Ankita Lokhande भावुक सोशल मीडियावर शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट
Sumona Chakravarti च्या पोस्टमध्ये तिने देशाच्या प्रगतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “हा देश सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं सांगितलं जातं. पण आज जे मी पाहिलं ते प्रगतशील समाजाचं चित्र नाही. जातीयवाद, धर्मवाद, राजकारण, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि निरक्षरता जोपर्यंत आहे, तोपर्यंत विकास नाही. हा नाश आहे,” असं कठोर शब्दांत मत व्यक्त करत सुमोनाने आपली नाराजी व्यक्त केली.
या पोस्टनंतर अभिनेत्री Sumona Chakravarti च्या सुरक्षेबद्दल अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालावं अशी मागणी होत आहे.
हे पण वाचा.. “कॅन्सरने शरीर झिजवलं, पण मन नाही…” Priya Marathe च्या निधनानंतर Prarthana Behere ची भावुक पोस्ट
Sumona Chakravarti इंस्टाग्राम पोस्ट










