ADVERTISEMENT

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत नवा ट्विस्ट! चांदेकरांच्या घरात सुकन्याची एन्ट्री; अद्वैतसमोर कलाच्या आठवणी पुन्हा जाग्या

sukanya new entry laxmichya paulani serial : लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत आता सुकन्याच्या प्रवेशामुळे कथेचा वेग वेगळ्या दिशेने वळताना दिसत आहे. चांदेकरांच्या घरात पहिल्याच दिवशी घडलेली एक घटना अद्वैतच्या मनात कलाची वेदना पुन्हा जागवते.
sukanya new entry laxmichya paulani serial

sukanya new entry laxmichya paulani serial : लोकप्रिय मराठी मालिका Laxmichya Paulani मध्ये नुकताच एक मोठा वळण प्रेक्षकांना पाहायला मिळालं, आणि त्यात आता आणखी एक रोमांचक ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य नायिका कला (इशा केसकर) या पात्राच्या एक्झिटनंतर मालिकेला सहा महिन्यांचा लीप मिळाला आणि नक्षत्रा मेढेकर हिने साकारलेली सुकन्या कथेचा नवा केंद्रबिंदू ठरू लागली. आता नव्या प्रोमोमध्ये सुकन्या चांदेकरांच्या घरात पाऊल ठेवताना दिसते आहे आणि तिच्या या आगमनामुळे संपूर्ण कथा नव्या उंबरठ्यावर उभी राहिली आहे.

कला गेल्यानंतर अद्वैतचा संसार एकाकी बनलेला असताना त्याच्या आयुष्यात अनपेक्षितपणे सुकन्याची एन्ट्री घडते. दोघांची पहिली भेट मंदिरात झाली होती आणि त्या भेटीत छोटासा वादही रंगला. मात्र, त्याच वेळी सुकन्याने अद्वैतच्या आजोबांचे मन जिंकून चांदेकरांच्या नजरेत आधीच एक चांगली छाप निर्माण केली होती.

आता आलेल्या प्रोमोमध्ये अद्वैत आपल्या आजोबांसाठी नर्स शोधत असताना सुकन्या त्या पदासाठी उशिरा पोहोचली असली तरी तिचीच निवड झाल्याचं दिसतं. प्रोमोमध्ये चांदेकरांच्या बंगल्याबाहेर उभी असलेली सुकन्या आत प्रवेश करण्यापूर्वी परिसर निरखत असते. तेवढ्यात अद्वैत तिच्यावर हलकीशी टोलेबाजी करत तिला आत बोलावतो.

सुकन्या बंगल्यात शिरते तेव्हा तिची नजर तुळशीमध्ये ठेवलेल्या मंगळसूत्रावर जाते. ते हातात घेऊन ती अद्वैतला त्याबद्दल विचारते — “हे मंगळसूत्र इथे सापडलं… म्हणजे हे घरच्या लक्ष्मीचंच असेल ना?” या प्रश्नाने अद्वैत थबकतो आणि घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर बदललेले भाव दिसू लागतात. याच क्षणी कलाच्या आठवणी अद्वैतच्या मनात घट्टपणे उमटताना दिसतात.

सुकन्या चांदेकरांच्या घरात येणं म्हणजे केवळ नर्सची भूमिका नाही, तर कथेतील संभाव्य नवीन भावना आणि गुंतागुंत यांची सुरुवात आहे. अद्वैतच्या आयुष्यातील रिकामपणा सुकन्या भरून काढणार का? की कलाची जागा कुणीच घेऊ शकत नाही? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हे पण वाचा.. स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत नवा कलाटणीकारक ट्विस्ट; यशसारख्या दिसणाऱ्या युगची धमाकेदार एन्ट्री

Laxmichya Paulani मालिकेचा हा नवा भाग १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि पुढचा नाट्यमय प्रवास अधिक रंगतदार होणार, याची चाहत्यांना खात्री आहे.

हे पण वाचा.. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर खचली होती Girija Oak; थेरपीच्या आधारानं उभी राहिलेल्या प्रवासाची भावुक कहाणी सांगत म्हणाली

sukanya new entry laxmichya paulani serial