ADVERTISEMENT

स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकांची जोरदार एंट्री; ‘नशीबवान’ ठरली स्लॉट लीडर, ‘लपंडाव’नेही मारली दमदार झेप

star pravah navya malika trp nashibvan lapandav : ‘स्टार प्रवाह’ने प्रेक्षकांसमोर आणलेल्या दोन नव्या मालिकांना पहिल्याच आठवड्यात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आदिनाथ कोठारेच्या ‘नशीबवान’ने प्राइम स्लॉटमध्ये लीड घेतला, तर ‘लपंडाव’ने दुपारच्या सत्रात विक्रमी टीआरपी मिळवला.
star pravah navya malika trp nashibvan lapandav

star pravah navya malika trp nashibvan lapandav : मराठी मनोरंजनविश्वात सध्या टीआरपीची शर्यत रंगली आहे. प्रत्येक वाहिनी आपल्या प्रेक्षकांना नवनवीन मालिका देत आहे. अशातच स्टार प्रवाह ने १५ सप्टेंबरपासून दोन ताज्या मालिकांचा शुभारंभ केला आणि या दोन्ही मालिकांनी पहिल्याच आठवड्यात दमदार कामगिरी करत वाहिनीच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

दुपारच्या सत्रात दाखल झालेली ‘लपंडाव’ ही मालिका रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांच्या अभिनयाने सजली आहे. रुपाली आणि चेतन यांचं वाहिनीवरील पुनरागमन आणि कृतिकाची पहिलीच मालिका या दोन्ही गोष्टींमुळे मालिकेची चर्चा सुरू होती. सरकार, सखी आणि कान्हा या व्यक्तिरेखांची कहाणी प्रेक्षकांना पहिल्याच आठवड्यात भावली आणि या मालिकेला तब्बल २.७ टीआरपी मिळाला. दुपारच्या स्लॉटमध्ये इतक्या दमदार आकडेवारीसह ‘लपंडाव’नं विक्रमी सुरुवात केली आहे.

तर दुसरीकडे प्राइम टाइममध्ये दाखल झालेली आदिनाथ कोठारेची ‘नशीबवान’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर पहिल्याच आठवड्यात राज्य करू लागली आहे. आदिनाथची ही पहिलीच दैनंदिन मालिका असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दाटून आली होती. ९ वाजताच्या स्लॉटमध्ये मोठी स्पर्धा असतानाही या मालिकेनं ३.७ टीआरपी मिळवत थेट ‘स्लॉट लीडर’चा किताब पटकावला आहे.

हे पण वाचा.. ताडपत्रीच्या घरातून स्वप्नपूर्तीपर्यंत : गौरव मोरेला म्हाडाच्या नव्या घराचा ताबा

दोन्ही मालिकांच्या दमदार कामगिरीची अधिकृत आकडेवारी स्टार प्रवाह वाहिनीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली. मालिकांचा हा यशस्वी ओपनिंग रेकॉर्ड पाहता आता पुढील आठवड्यांतही प्रेक्षकांचा उत्साह तसाच टिकतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘स्टार प्रवाह’ नेहमीच कथानक आणि कलाकारांच्या जोरावर प्रेक्षकांना नवीन प्रयोग देत आली आहे. ‘नशीबवान’ आणि ‘लपंडाव’ या मालिकांनी त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आणून दिला आहे

हे पण वाचा.. “लाखात एक आमचा दादा” मालिकेचं शूटिंग पूर्ण; कलाकारांचा गोवा-गोकर्ण सफरीत धमाल, फोटो व्हायरल

star pravah navya malika trp nashibvan lapandav